Goa Electricity : कर्नाटकमुळेच गोव्यात उद्‍भवला वीजप्रश्‍न : मंत्री ढवळीकर

कर्मचाऱ्यांना देणार संभाषण प्रशिक्षण
Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar Dainik Gomantak

गोव्याला वीजपुरवठा करणाऱ्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकांमुळे गेेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा यंत्रणेतील दुरुस्तीची कामे केली नसल्यामुळे गोव्यात सध्या विजेचा खेळखंडोबा सुरू आहे, असा दावा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे.

पणजीतील विद्युत भवनातील पत्रकार परिषदेमध्ये मंत्री ढवळीकर बोलत होते. यावेळी मुख्य अभियंते स्टीफन फर्नांडिस आणि राजीव कामत उपस्थित होते. गोव्याला कर्नाटकातून वीजपुरवठा होणाऱ्या यंत्रणेत अडथळे निर्माण होत असल्याने वारंवार वीज खंडित होते.

अशातच उन्हाळ्यामुळे वाढलेली विजेची मागणी आणि ग्राहकांनी वीज खात्याकडे नोंदवलेली कमी विजेची मागणी यांमुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला ही बाब नित्याचीच असते. मात्र, आता यामध्ये सुधारणा करत असल्याचे वीजमंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

यावेळी मंत्री ढवळीकर म्हणाले की, गोव्याला कर्नाटकातील आंबेगाव प्रकल्पातून वीजपुरवठा केला जातो. कर्नाटकात मे महिन्यात विधानसभा निवडणुका होत्या. त्यामुळे या वीजपुरवठा यंत्रणेमधील दुरुस्त्या केल्या गेल्या नव्हत्या. गुरुवारपासून दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे गोव्यात विजेचा लपंडाव सुरूच आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत तो सुरळीत होईल.

Sudin Dhavalikar
Vasco: गोवा नेव्हल एरिया मुख्यालयाच्या गेटसमोर कर्मचारी युनियनचे आंदोलन, जुन्या पेन्शनबाबत मोठी मागणी

मुख्य पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे वीज वारंवार खंडित

  • वीज खंडित झाल्यानंतर ग्राहकांकडून फोन येतात. या फोनवर कर्मचाऱ्यांकडून उद्धट भाषा वापरली जाते. अशा तक्रारी माझ्याकडे येत आहेत. याकरिता वीज कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी कसे बोलावे, याचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

  • गोमंतकीयांना विनाखंड वीज पुरवठा करण्‍याचे आपले लक्ष्‍य आहे. त्‍यासाठी आवश्‍‍यक त्‍या सर्व तरतुदी व नियोजन करण्‍यावर भर देण्‍यात येत आहे. नागरिकांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्‍यासाठी खाते कटिबद्ध आहे, असेही मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

सेंट झेवियर शवप्रदर्शनासाठी वीजव्यवस्था

वीज मंडळाकडून राज्यात होत असलेल्या जी-२० बैठका आणि त्यासंबंधीची कामे एका महिन्यात संपवली आहेत. यासाठी ७० कोटी रुपये खर्च आला आहे. केवळ चार दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण केली.

याशिवाय जुने गोवे येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शनाच्या निमित्ताने आवश्यक असलेली कामे, अंतर्गत वीजवाहिन्या यांची कामे सुरू आहेत असेही मंत्री ढवळीकर म्हणाले.

Sudin Dhavalikar
FC Goa: एफसी गोवा संघात नवा खेळाडू, मणिपुरी बोरिस सिंगसोबत दीर्घकालीन करार

दुरुस्तीची 90 टक्के कामे पूर्ण

गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांतील दुरुस्तीची ९० टक्के कामे संपवण्यात आली आहेत. मांद्रे परिसराला पेडणे भागातून वीज मिळते. या विद्युत वाहिनीमध्येही बिघाड झाला होता. त्यामुळे या ठिकाणी नवी वीज उपकरणे, ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत. याशिवाय वेर्णा, कुंकळ्ळी, सासष्टी, पेडणे या भागांतील कामेही पूर्ण केली आहेत.

५० टक्के कामांच्या निविदा पूर्ण

वीज खात्याचा महसूल वाढवणे, वेळेवर बिल देणे, मीटरच्या तक्रारी दूर करणे या प्रकारच्या सूचनाही दिल्या आहेत. यापूर्वी वीजवाहिनी दुरुस्ती आणि पुरवठ्यासाठी प्रत्येक मतदारसंघात ४० कोटी रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आम्ही ते पाळले असून यातील ५० टक्के मतदारसंघांतील विविध दुरुस्ती कामांच्या निविदा काढल्या आहेत, असेही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यावेळी म्हणाले.

२०० लाईनमन पदे ऑगस्टमध्ये भरणार

वीज कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सुविधा पुरवल्या असून लाईनमनसाठी बूट, ग्लोव्हज, रेनकोट आणि इतर साहित्य दिले आहे. वीज खात्यात २०० लाईनमनची कमतरता असून ऑगस्टमध्ये ती पदे भरण्यात येतील, असेही ढवळीकर म्हणाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com