Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: जाहिरातीनंतर दोन वर्षांनी लेखी परीक्षेचा घाट

Goa Government: लोकसभा निवडणूक जवळ आल्यावर कर्मचारी भरतीची आठवण सरकारला होऊ लागली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: लोकसभा निवडणूक जवळ आल्यावर कर्मचारी भरतीची आठवण सरकारला होऊ लागली आहे. गेली दोन वर्षे सर्वसाधारण प्रशासन खात्यातील कर्मचारी भरतीसाठी जाहिरात देऊन उमेदवारांकडून घेतलेल्या अर्जांचा सरकारला विसर पडला होता.

आता त्यावेळी अर्ज केलेल्यांची लेखी परीक्षा घेण्यासाठी पुन्हा जाहिरात दिली आहे. नियमानुसार जाहिरात दिल्यानंतर सहा महिन्यांत सर्व भरती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. या नियमाला बाजूला सारून सरकारने लोकसभा निवडणुकीतील मतांवर डोळा ठेवून ही पदे भरण्यासाठी घाई चालवली आहे.

सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्यात कनिष्ठ साहाय्यक, वरिष्ठ साहाय्यक आणि लघुलेखक श्रेणी-2 ही पदे भरण्यासाठी 14 ऑक्टोबर 2021 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात बहुउद्देशीय कर्मचारी (मल्टी टास्किंग) 31 पदे, कनिष्ठ साहाय्यक 42 पदे, वरिष्ठ साहाय्यकांची २० पदे, लघुलेखक श्रेणी-२ची 15 पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज मागवले होते.

यासाठी उमेदवारांकडून प्रत्येकी 200 रुपयांचे शुल्क आकारले होते. एका उमेदवाराने दोन पदांसाठी अर्ज केला असेल तर त्याला 400 रुपये शुल्क भरावे लागले होते. तरीही अनेकांनी या पदांसाठी अर्ज केले होते. त्यानंतर यातील कनिष्ठ व वरिष्ठ साहाय्यक पदासाठीची भरती करण्याचा सरकारी पातळीवर विसर पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT