Goa Politics: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या कारभाराची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली असून प्रशासकीय अपयशावर आणखी एका पदासीन राज्यपालांनी चिंता व्यक्त करणे हे धक्कादायक आहे.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे भ्रष्टाचारावर उघडपणे बोलल्यानंतर आता राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याच्या ‘हॅपिनेस इंडेक्स’संबंधी शंका उपस्थित केली आहे.
यावरून भाजप सरकारचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे, असे विधान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याच्या हॅपिनेस इंडेक्सवर भाष्य करण्याचे टाळले, यावर प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्याची अर्थव्यवस्था आणि प्रशासनाला पुनरुज्जीवित करण्यात मदत करणाऱ्या महत्त्वाच्या अभ्यास अहवालांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भाजप सरकारला दोष देत जबाबदार धरले आहे.
कॉंग्रेस सरकारने नेमलेले प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या तज्ज्ञांनी तयार केलेल्या ‘गोवा व्हिजन-२०३५ डॉक्युमेंट’च्या शिफारशींची अंमलबजावणी करणे आणि काँग्रेस सरकारनेच तयार केलेल्या मनुष्यबळ विकास अहवालाच्या अंमलबजावणीवरही काम केल्यास गोमंतकीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यास मदत होणार आहे, हे मुख्यमंत्री
गोवा दरडोई उत्पन्न व विकासाबाबत अव्वल आहे, तर मिझोराम खूप मागास आहे. परंतु आनंदी किंवा उत्साही वातावरणाबाबत मिझोराम अग्रस्थानी आहे, तर गोव्याच्या स्थानाबाबत आपण न बोललेले बरे, असे मत राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केले आहे.
एका कार्यक्रमात पिल्लई म्हणाले, आनंदी आणि उत्साही राज्य म्हणून २०२१ मध्ये मिझोराम अनुक्रमणिकेत पहिल्या स्थानावर होते, असे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या; परंतु गोवा राज्य दरडोई उत्पन्नात पहिल्या स्थानावर असले तरी आनंदी वातावरणात ते कोणत्या स्थानावर आहे हे सांगू शकत नाही, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.