ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी Dainik Gomantak
गोवा

'पूजा ही ईश्वराला भाव समर्पित करणारी विधी'

ब्रह्मेशानंदाचार्य स्‍वामी: तपोभूमीवर श्रीगुरु महापूजेने जन्माष्टमी महोत्सव उत्साहात

दैनिक गोमन्तक

खांडोळा: सच्चिदानंद स्वरूप सर्वांमध्ये विराजमान आहे. तो नसेल तर हे शरीर मृतवत आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. म्‍हणूनच आम्‍ही हे मनुष्य शरीर धारण केलेलं आहे. मनुष्य प्राणी सोडून अन्य कुठल्याही प्राण्याला हा अधिकार प्राप्त झालेला नाही. माणसाच्या जन्माला आल्यानंतर ईश्वराला जोडण्याची, ईश्वराची अनुभूती घेण्याची व्यवस्था सनातन वैदिक हिंदू धर्मात आहे, असे उद्‌गार धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी काढले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर 10 मार्च रोजी ‘पद्मश्री’ विभूषित स्वामी जन्माष्टमी महोत्सव तथा दत्तगुरुवार भक्ती उत्सव मोठ्या थाटात पार पडला. या प्रसंगी स्वामी संबोधित करीत होते.

ते म्‍हणाले की, आपल्या मनामध्ये भगवंताप्रति, सद्गुरुंप्रति पूज्य भाव ठेवून पूजा केली जाते ती पूजा होय. पूजा हा ईश्वराला भाव समर्पित करणारा विधी आहे. श्रीगुरुंचा अवतार याचसाठी असतो की ते समाजाला शांतीच्या दिशेने, ईश्वरी सत्ता मान्य करण्यासाठी प्रेरित करतात. मनुष्याला ईश्वराकडे मार्गस्थ करण्याठी श्रीगुरु महत्वपूर्ण आहे.

सकाळच्या सत्रात नयन संदीप चोडणकर यांच्या यजमानपदाखाली व गुरुपीठाच्या वैदिक शिष्यांच्या पौरोहित्याद्वारे सद्गुरु भक्ती महायज्ञ, पूज्य सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामी दिव्य समाधी अभिषेक, पूजन, अखंड दत्तमाला मंत्र जपानुष्ठान तर संध्याकाळच्या सत्रात दिंडी मिरवणुकीने स्वामींचे व्यासपीठावर आगमन, प्रार्थना, शैला पुंडलिक नाईक यांच्या यजमानपदाखाली संप्रदायाच्या संत समाज अध्यक्षांद्वारे पूज्य सद्गुरु महापूजा, दिव्य ज्योतिराराधना, पुष्पमालार्पण, पूज्य सद्गुरु आशीर्वचन, शांतीपाठ, दर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

दत्तगुरुवार भक्ती उत्सवाचे यजमानपद कमलाकांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संत समाज हातुर्लीने भूषविले.या ऐतिहासिक सोहळ्यास सद्गुरू फाउंडेशनच्या अध्यक्षा व श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या संचालिका अँड. ब्राह्मीदेवीजी, सामाजिक विभागाध्यक्ष संजय कळंगुटकर, महाप्रबंधक शुभक्षण नाईक, कृपाकांक्षी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन महामंत्री राजेश दळवी व वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाटील यांनी केले तर स्वागत-प्रस्तावना संजय कळंगुटकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT