Goa Mission Rabies 
गोवा

Goa Mission Rabies: 6 तालुके, 109 केंद्र! गोव्यात मोफत रेबीज लसीकरण मोहीम; कधी, कुठे? जाणून घ्या सर्वकाही

नागरिकांनी केंद्रावर भेट देऊन श्वानांचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Pramod Yadav

Goa Mission Rabies: जागतिक रेबीज दिनानिमित्त गोव्यात मोफत लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. राज्यातील सहा तालुके आणि 109 केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

29 सप्टेबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत लसीकरण सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सासष्टी, फोंडा, सांगे, केपे, मुरगाव आणि तिसवाडी असे एकूण सहा तालुक्यात लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये नव्वद पंचायत केंद्र आणि 19 इतर केंद्र अशा एकूण 109 केंद्रांवर लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.

नागरिकांनी केंद्रावर भेट देऊन श्वानांचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Static Point Vaccination Campaign

'गोवा देशातील पहिले 'रेबीज नियंत्रित क्षेत्र' आहे. राज्यात मानवात रेबीज संक्रमण रोखण्यात आले आहे. याबद्दल मी राज्य पशुसंवर्धन विभाग आणि मिशन रेबीजचे अभिनंदन करतो. राज्याची कामगिरी टिकवून ठेवण्यासाठी आणि कुत्र्यांमधील विषाणू नष्ट करण्यासाठी आम्ही संपूर्ण वर्षभर कुत्र्यांचे लसीकरण सुरू ठेवतो आणि तालुक्यांमध्ये वर्षातून एकदा लसीकरण केले जाते.'

'गोव्यातील लोक श्वानप्रेमी आहेत. जबाबदार पाळीव प्राणी मालक व्हा, कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण करा अशी मी जनतेला विनंती करतो.' असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजीतील एका कार्यक्रमात केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT