World Meteorological Day Dainik Gomantak
गोवा

World Meteorological Day : सावधान; गोव्यालाही हवामान बदलांचा फटका !

World Meteorological Day : जागतिक हवामान दिन हरित उर्जेकडे वळणे ही काळाची गरज

गोमन्तक डिजिटल टीम

World Meteorological Day :

पणजी, संपूर्ण जगाला हवामान बदलांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आत्ताच जर सर्वांनी यावर योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात आम्हाला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.

म्हणूनच यंदाच्या जागतिक हवामान दिनाची संकल्पना ‘हवामान बदल कृतीच्या अग्रभागी’ अशी आहे.

हवामान बदलांच्या धोक्यांपासून वाचण्यासाठी सर्वांना शाश्‍वत विकासाच्या अनुषंगाने पावले उचलावी लागतील. गोव्यासारख्या निसर्गरम्य राज्यातही हवामान बदलांचा प्रभाव जाणवू लागला आहे. प्रचंड उष्मा, आकस्मिक एकाच दिवशी ६ इंचाहून अधिक पाऊस, हिवाळी थंडीत कमतरता आदी प्रकार जाणवू लागल्याने यावर पावले उचलणे काळाची गरज आहे.

सातत्याने तापमानवाढ चिंतेची बाब

गोव्यातील उन्हाळ्यातील सर्वसाधारण कमाल तापमान ३४ अंश एवढे असते. मात्र काही वेळा अशा घटना घडतात की, उष्ण वारा वाहू लागतो.

२०२२ मध्ये उन्हाळ्यात ३७ अंशावर पोहोचते. मागील उन्हाळ्यात ३९ अंशांपर्यंत तापमानात वाढ झाली होती, २०१३, २००९ व २००८ साली देखील तापमान वाढ मोठ्या प्रमाणात झाली. मागील साठ वर्षांचा तापमानाचा तपशील पाहता ०.५ अंशांनी सातत्याने तापमानात वाढ होत असून ही चिंताजनक बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

२०१४ ते २०२३ हे दशक सर्वात उष्ण दशक ठरले. जगभरात ज्या प्रमाणे तापमानात वाढ होत आहे तशीच गोव्यातही होत असून ही सर्वांसाठी धोक्याची सूचना असून आत्ताच योग्य ती पावले उचलली पाहिजेत. आम्ही नैसर्गाशी मैत्री करत शाश्‍वत जीवनशैली अंगिकारली पाहिजे. जल, जंगल, जमीन, वायु यांचे नुकसान होईल असे काही करता कामा नये.

-डॉ. एम.आर.रमेशकुमार, शास्त्रज्ञ.

हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ ही आता संपूर्ण जगाची समस्या असून ती आपण नाकारू शकत नाही. गोवा राज्यही याचा भाग आहे. मोठ्या प्रमाणात होणारे शहरीकरण, प्रदूषण आणि सोबत जीवनशैलीतील बदल हे या हवामान बदलाचे घटक बनताना दिसत आहेत. ही तापमानवाढ नियंत्रणात आणण्यासाठी हरित ऊर्जा, शाश्‍वत जीवनपद्धतीचा अवलंब शक्य तेवढ्या लवकर करणे गरजेचे आहे. ‘हवामान स्मार्ट नागरिक’ म्हणून प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे.

-नहूष कुलकर्णी, संचालक, गोवा वेधशाळा.

एकाच दिवशी सर्वाधिक पावसाच्या नोंदी

यंदा राज्यात थंडी सुरू व्हायला उशीर झाला. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये थंडी जाणवत नव्हती. केवळ पहाटे काही प्रमाणात थंडी जाणली. राज्यातील घाटलगतच्या भागात मात्र फेब्रुवारी महिन्यात नागरिकांना थंडी अनुभवता आली.

यंदा मॉन्सूनवर ‘अल निनो’चे संकट घोंघावत असतानाही राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडला. परंतु एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यंदाचा जून महिना आणि मागील ७६ वर्षांच्या तुलनेत ऑगस्ट महिना शंभर वर्षातील सर्वाधिक कोरडा ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT