Goa Cricket Association: सागर उदेशीच्या फिरकीचा विळखा; चौगुले क्लबचा दुसरा डाव 94 धावांत संपुष्टात

Goa Cricket Association's Premier League : २४ धावांत ८ विकेट ः साळगावकरचा चौगुलेवर दहा विकेटने विजय
Sagar Udeshi
Sagar Udeshi Dainik Gomantak

Goa Cricket Association's Premier League: अनुभवी गोलंदाज सागर उदेशी याच्या डावखुऱ्या फिरकीचा विळखा खूपच घट्ट ठरला, त्यातून सुटका करून घेणे चौगुले स्पोर्टस क्लबच्या फलंदाजांना जमले नाही.

परिणामी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात दुसऱ्याच दिवशी गुरुवारी साळगावकर क्रिकेट क्लबने सलग दुसरा सामना जिंकताना १० विकेटने बाजी मारली.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर पुदुचेरीकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या सागरने दुसऱ्या डावात २४ धावांत ८ गडी टिपले, त्यामुळे पहिल्या डावात ६४ धावांनी पिछाडीवर पडलेल्या चौगुले क्लबचा दुसरा डाव ९४ धावांत संपुष्टात आला.

साळगावकर क्लबला विजयासाठी ३१ धावांचे आव्हान मिळाले, ते त्यांनी एकही विकेट न गमावता ४.२ षटकांत पार करून बोनस गुणाची कमाई केली. सागरने सामन्यात ७८ धावांत १३ विकेट प्राप्त करण्याचा पराक्रम साधला.

त्याने पहिल्या डावात ५४ धावांत ५ गडी बाद केले होते. सलग दुसरा सामना बोनस गुणासह जिंकल्यामुळे साळगावकर क्लबचे सर्वाधिक १४ गुण झाले आहेत. चौगुले क्लबला लागोपाठ दुसरा पराभव पत्करावा लागला.

सांगे येथील मैदानावर स्नेहल कवठणकर (नाबाद ६४) व शिवेंद्र भुजबळ (नाबाद ४१) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद १०४ धावांच्या भागीदारीमुळे ११८ धावांच्या पिछाडीनंतर पणजी जिमखान्याने दुसऱ्या डावात ३ बाद १५६ धावा करून जीनो स्पोर्टस क्लबविरुद्ध ४४ धावांची आघाडी मिळविली.

चिखली-वास्को येथील मैदानावर योगेश कवठणकर (४-७४), राहुल मेहता (३-४७) व यश कसवणकर (२-६६) यांच्या फिरकीच्या बळावर मडगाव क्रिकेट क्लबने धेंपो क्रिकेट क्लबवर पहिल्या डावात ३९ धावांची आघाडी घेतली.

संक्षिप्त धावफलक

१) चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः १४४ व दुसरा डाव ः २८ षटकांत सर्वबाद ९४ (आयुष वेर्लेकर २०, सागर उदेशी १४-४-२४-८, ईशान मुलचंदानी २-२९) पराभूत वि. साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव (४ बाद ९३ वरुन) ः ५५.१ षटकांत सर्वबाद २०८ (दीपराज गावकर ८८- ९१ चेंडू, १० चौकार, २ षटकार, लखमेश पावणे १५, ईशान मुलचंदानी २४, पार्थ भूत ७-७१, कीथ पिंटो २-७७) व दुसरा डाव ः ४.२ षटकांत बिनबाद ३३ (आर्यन नार्वेकर नाबाद १५, प्रथमेश गावस नाबाद १४).

२) पणजी जिमखाना, पहिला डाव ः १४१ व दुसरा डाव ः ४० षटकांत ३ बाद १५६ (आयुष पांडे ३३, स्नेहल कवठणकर नाबाद ६४, शिवेंद्र भुजबळ नाबाद ४१) विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव (१ बाद ७३ वरून) ः ७३.३ षटकांत सर्वबाद २५९ (ज्योत्सनिल सिंग ६६, आनंद तेंडुलकर ३७, देवन चित्तेम ३४, वासू तिवारी ५३, अमूल्य पांड्रेकर २८, विजेश प्रभुदेसाई २-५२, अमित यादव २-५२, सत्यजीत बच्छाव ४-६१).

३) मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव ः सर्वबाद ३१८ व दुसरा डाव ः ५.४ षटकांत १ बाद २२ विरुद्ध धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः ७२ षटकांत सर्वबाद २७९ (अजय रोहेरा ७३, शिवम आमोणकर २८, पार्थ साहनी २१, विकास सिंग ७३, राहुल मेहता ३-४७, योगेश कवठणकर ४-७४, यश कसवणकर २-६६).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com