World Food Security Day  Dainik Gomantak
गोवा

World Food Security Day : जागतिक अन्नसुरक्षा दिन ‘ताज हॉटेल्स’तर्फे साजरा

World Food Security Day: यानिमित्त अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयातर्फे ताज हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांसमोर फिरत्या चाचणी प्रयोगशाळेद्वारे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

World Food Security Day :

पणजी, ताज हॉटेल्स उत्तर गोवा यांच्यातर्फे विविध उपक्रमांसह जागतिक अन्नसुरक्षा दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्त अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयातर्फे ताज हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांसमोर फिरत्या चाचणी प्रयोगशाळेद्वारे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी विविध अन्नपदार्थांमध्ये कशाप्रकारे भेसळ केलेली असते आणि त्याची आपण कशाप्रकारे चाचणी करू शकतो ते दाखविण्यात आले. यातून पदार्थ शिजवताना कशाप्रकारे अन्नाचा दर्जा राखावा, याविषयी जागृती करण्यात आली.

यावेळी हॉटेलच्या विविध विभागांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. त्यात विविध विभागांचे कर्मचारी सहभागी झाले. त्यात ताज फोर्ट आग्वाद गोवा, ताज हॉलिडे व्हिलेज गोवा आणि आमा स्टेज गोवा यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

शेफ आशुतोष शेंडे यांच्या नेतृत्वाखाली बिगर शेफ कर्मचाऱ्यांनी आपल्या पाककलेचे दर्शन घडवले. त्यांनी स्थानिक घटकांचा समावेश असलेले विविध पदार्थ तयार करून आपले कौशल्य प्रदर्शित केले.

यावेळी अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाच्या संचालक ज्योती सरदेसाई उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात या आस्थापनातर्फे अन्न दर्जा व सुरक्षितता उत्तम राखली जात असल्याबद्दल प्रशंसा केली. याशिवाय ‘गेस युवर स्पाईसेस’ ही स्पर्धा आयोजिण्यात आली. ताज फोर्ट आग्वाद रिसॉर्टच्या सरव्यवस्थापक मेघा भाटिया आणि ताज हॉलिडे व्हिलेज रिसॉर्ट अँड स्पाचे सरव्यवस्थापक सौविक भट्टाचार्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

Goa Crime: म्हापशात पोलिसांची मोठी कारवाई;2 किलो गांजा जप्त, झारखंडच्या 22 वर्षीय युवकाला अटक

Porvorim Elevated Road: 600 कोटींचा पर्वरी उन्नत मार्ग, तरीही वाहतूक कोंडी कायम! अपघातानंतर निर्बंधांचा भडिमार; 'सदोष नियोजनाची जबाबदारी कोणाची?'

SCROLL FOR NEXT