Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Jos Buttler 15000 T20 Runs World Record: बटलरने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 15000 धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला फलंदाज बनण्याचा अद्वितीय पराक्रम केला.
Jos Buttler 15000 T20 Runs World Record
Jos Buttler World RecordDainik Gomantak
Published on
Updated on

Jos Buttler 15000 T20 Runs World Record: कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान इंग्लंडने श्रीलंकेचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने 9 गडी गमावून 145 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाने हे लक्ष्य अवघ्या 12.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात लिलया पार केले. परंतु, या सामन्यातील विजयापेक्षाही इंग्लंडचा स्टार विकेटकीपर फलंदाज जॉस बटलर याने रचलेल्या ऐतिहासिक विक्रमाची चर्चा जगभरात सुरु आहे.

146 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बटलरने 16 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 30 धावांची विस्फोटक खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर बटलरने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 15000 धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला फलंदाज बनण्याचा अद्वितीय पराक्रम केला. 36 वर्षीय बटलरने आपल्या 528 व्या सामन्याच्या 497 व्या डावात हा करिश्मा करुन दाखवला. या प्रवासात त्याने 9 शतके आणि 107 अर्धशतके झळकावली.

Jos Buttler 15000 T20 Runs World Record
ENG vs IND 1st ODI: कॅच तर घेतला, पण श्वास रोखला! लाईव्ह मॅचमध्ये शुभमन-गुरनूर जोरदार धडकले; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

या ऐतिहासिक कामगिरीसह बटलरने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू कायरन पोलार्डला (14,999 धावा) मागे टाकत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. या यादीत इंग्लंडचा (England) ॲलेक्स हेल्स (14,581) तिसऱ्या, ख्रिस गेल (14,562) चौथ्या आणि डेव्हिड वॉर्नर (14,284) पाचव्या स्थानी आहे. तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली 14,218 धावांसह या यादीत सहाव्या स्थानी आहे.

Jos Buttler 15000 T20 Runs World Record
IND vs ENG: फक्त 'इतकं' करा आणि 2 विक्रम मोडा! ओव्हलमध्ये घडणार मोठा करिष्मा; भारत-इंग्लंड मिळून मोडणार 70 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड

सामन्याबद्दल बोलायचे तर, हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघासाठी टॉम बँटनने 24 चेंडूंत नाबाद 52 धावांची धडाकेबाज खेळी खेळत विजय सुकर केला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडचा हा सलग 14वा विजय ठरला. आता उभय संघांमधील मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 19 सप्टेंबर रोजी मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com