South Goa : ध्रुवीकरणाचा मुद्दा भाजपवर बुमरँग; दक्षिणेतील पराभव ख्रिस्ती धर्मगुरूंमुळे हे ढवळीकर, माविन यांना अमान्य

South Goa : भाजपच्या युतीतील सहकारी मगोपचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि भाजपचेच आमदार असलेले पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी भाजपच्या या प्रचारापासून स्वतःला दूर केले आहे.
bjp
bjp Dainik Gomantak

South Goa :

पणजी, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील पराभवाचे खापर भाजपकडून ख्रिस्ती धर्मगुरूंवर फोडण्याचा भाजपचा प्रयत्न त्यांच्यावरच बुमरॅंग ठरून उलटला आहे.

भाजपच्या युतीतील सहकारी मगोपचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि भाजपचेच आमदार असलेले पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी भाजपच्या या प्रचारापासून स्वतःला दूर केले आहे. आपण या म्हणण्याशी सहमत नसल्याचे जाहीरपणे सांगण्याचे धाडसही त्यांनी दाखविले आहे.

दुसरीकडे, धर्मगुरूंवर धार्मिक ध्रुवीकरणाचा ठपका ठेवणारे वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे आमदार संकल्प आमोणकर आणि प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या केंद्रीय समितीचे सदस्य गिरीश चोडणकर यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील जागा भाजपने विशेषतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांची उमेदवारी थेटपणे पक्षश्रेष्ठींकडून निश्चित झाल्याने त्यांना निवडून आणण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली होती.

bjp
Goa Todays Update News: स्मार्ट सिटीच्या कामांचा अहवाल हायकोर्टात मांडण्यात आला

दिवसाआड ते दक्षिण गोव्याचा दौरा करत होते. असे असतानाही धेंपे यांना विजयी करण्यात अपयश आल्यानंतर काही धर्मगुरूंनी मतांचे ध्रुवीकरण केल्याने भाजपला विजय मिळविता आला नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी कोणत्‍या धर्माचे गुरू, याविषयी स्पष्टपणे भाष्य केले नव्हते. त्यांचा रोख खिस्ती धर्मगुरूंकडे असावा, असे मानले जात असे. वेर्णेकर आणि आमोणकर यांनी त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानावडे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आणि भाजपच्या पराभवास ख्रिस्ती धर्मगुरूंना जबाबदार धरले. या पद्धतीने या विषयाला पुन्हा वाचा फुटली. आता तर हा विषय थेट पोलिसांत पोचला आहे. भाजपकडून मतांचे ध्रुवीकरण तृणमूल कॉंग्रेसचे संयोजक समील वळवईकर म्हणाले, भाजपला मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे, हेच या वक्तव्यावरून दिसून येते. भाजपला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, तसेच अपयशही पचविता आले नाही.

दुसऱ्याला दोष देणे अयोग्य!

मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, आता निवडणूक संपली आहे. निवडणूक काळात बऱ्याच गोष्टी झाल्या. त्या आता विसरून जाणे आणि शांतता कायम ठेवणे, हेच सर्वांचे ध्येय असले पाहिजे. दक्षिण गोव्यात धार्मिक हस्तक्षेप झाला की नाही, या चर्चेची ही वेळ नव्हे.

जनतेच्या कल्याणासाठी सर्वांना काम करायचे आहे, ते ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही झटूया. भाजपला यश का मिळाले काही, काही भागांत मताधिक्य का मिळाले नाही, याचे आत्मपरीक्षण जरूर करावे; पण याला दोष दे, त्याला दोष दे, हे योग्य नव्हे.

भाजपकडून धार्मिक तेढ

‘आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर म्हणाले की, धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या प्रवक्त्यांवर भाजपने कारवाई केली पाहिजे. धार्मिक सलोखा असलेल्या राज्यात असे वक्तव्य खपवून घेतले जाऊ शकत नाही. दक्षिण गोव्यात विरियातो फर्नांडिस यांना २ लाख १६ हजार मते मिळाली आहेत. दक्षिण गोव्यात ख्रिस्ती मते १ लाख २० मते आहेत. मग उर्वरित ९० हजार मते त्यांना काय ख्रिस्ती धर्मगुरूंनी मार्गदर्शन केली म्हणून मिळाली का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

bjp
Goa Industries: औद्योगिक वसाहतींना वीज खात्‍याचा ‘शॉक’, महिना 40 तास बत्ती गुल; उद्योजकांनी व्यक्त केली चिंता

भाजप कार्यकर्त्यांनी काम केले नाही

मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, धर्मगुरूंकडून मतांचे ध्रुवीकरण झाले, असे मी मानत नाही. धर्मगुरू दोन्ही बाजूने असतात. समाजाला काय वाईट आणि काय बरे, याविषयीचे मार्गदर्शन करणे हे धर्मगुरूंचे दायित्व असते. ख्रिस्ती व हिंदू धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले. हिंदूंनी ते मार्गदर्शन पाळले नाही, तर ख्रिस्ती समाजाने ते पाळले, असे म्हणता येते. सर्व धर्मगुरू चांगले काम करत आहेत. भाजपचे काही मतदारसंघांतील कार्यकर्ते काम करत नव्हते, हे सत्य आहे. सत्य हेच अबाधित राहते.

दुसऱ्याला दोष देणे अयोग्य!

मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, आता निवडणूक संपली आहे. निवडणूक काळात बऱ्याच गोष्टी झाल्या. त्या आता विसरून जाणे आणि शांतता कायम ठेवणे, हेच सर्वांचे ध्येय असले पाहिजे. दक्षिण गोव्यात धार्मिक हस्तक्षेप झाला की नाही, या चर्चेची ही वेळ नव्हे. जनतेच्या कल्याणासाठी सर्वांना काम करायचे आहे, ते ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही झटूया. भाजपला यश का मिळाले काही, काही भागांत मताधिक्य का मिळाले नाही, याचे आत्मपरीक्षण जरूर करावे; पण याला दोष दे, त्याला दोष दे, हे योग्य नव्हे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com