

म्हापसा: म्हापसा पोलिसांनी कर्तव्यदक्षता आणि तत्पर तपास कौशल्याचे दर्शन घडवत दोन वेगवेगळ्या अपहरण प्रकरणांचा छडा लावला आहे. आंतरराज्य पातळीवर समन्वय साधत पोलिसांनी कर्नाटक व महाराष्ट्रातून एकूण चौघांची सुटका केली असून, याप्रकरणी एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
पहिली घटना ५ सप्टेंबर २०२६ रोजी काणका (बार्देश) येथे घडली होती. मूळ गदग (कर्नाटक) येथील एका महिलेच्या २२ आणि १७ वर्षीय दोन मुलींचे अज्ञाताने अपहरण करून त्यांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवले होते. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२), १४०(३) व गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.
पोलिसांनी तपास करत या दोन्ही मुलींचा माग काढला आणि कर्नाटकात मंगळुरू येथील कंकनाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून त्यांची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी वाकदोध वकील (वय २६, रा. होस्पेट/बल्लारी, कर्नाटक) याला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा पोलिस उपअधीक्षक आशिष शिरोडकर आणि निरीक्षक नवीन देसाई यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक मंगेश पाळणी, उपनिरीक्षक विराज कोरगावकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल साहिल जात्ये, आकाश पाटील, अनिल राठोड, प्रवीण पाटील तसेच महिला कॉन्स्टेबल श्रुती मांद्रेकर आणि लता गावडे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली. या प्रकरणांचा तपास पोलिस करत आहेत.
अकलूज येथून दोघांची मुक्तता
दुसऱ्या घटनेत, ११ सप्टेंबर २०२६ रोजी खोर्ली-म्हापसा येथून एका ३७ वर्षीय विवाहितेसह तिच्या ९ वर्षांच्या मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि तत्पर पावले उचलत अवघ्या काही दिवसांत या मायलेकाचा शोध घेतला. महाराष्ट्रातील अकलूज येथून दोघांची सुखरूप सुटका करून त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.