Worker union Dainik Gomantak
गोवा

Workers Union: मागण्या मान्य करा, अन्‍यथा आंदोलन; कामगार युनियनचा सरकारला इशारा

आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा युनायटेड बालरथ कामगार युनियनच्‍या अध्यक्षा स्वाती केरकर यांनी दिला.

दैनिक गोमन्तक

Workers Union: बालरथ कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न गंभीर असून आपण त्यांना योग्य न्याय देणार आहे. बारा महिन्यांचे वेतन तसेच पगारात वाढ देखील करणार आहे, असे आश्‍‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. परंतु अजून ते पूर्ण झालेले नाही.

सहन करण्याची देखील एक सीमा असते. आता सहनशीलतेची अंत होत असून पुढील पंधरा दिवसांत न्याय मिळाला नाही तर आम्ही आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा युनायटेड बालरथ कामगार युनियनच्‍या अध्यक्षा स्वाती केरकर यांनी दिला.

आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत केरकर बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, सचिव शिवकुमार नाईक, दिलीप गावडे व इतर बालरथ कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

शालेय व्यवस्थापनाकडून बालरथ कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येतो, मात्र तो देण्यास विलंब केला जातो. सरकारने पैसे पाठविले नसल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडून इतर कामे देखील करवून घेतली जातात. नकार दिल्यास कामावरून काढून टाकू असे सांगण्यात येते.

सरकारी कार्यक्रम, क्रीडा कार्यक्रम तसेच सरकारच्‍या विविध महोत्सवांनाही बालरथ मागविले जातात. पण कामाचे कोणतेही अतिरिक्त वेतन देण्यात येत नाही. तरीसुद्धा त्‍यांना ‘पार्ट टाईम’ कर्मचारी असे संबोधले जाते.

844 कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न

बालरथ योजना सुरू होऊन 13 वर्षे पूर्ण होत आली. राज्यभर एकूण 422 बालरथ असून यामध्ये एक चालक व एक साहाय्यक नेमलेला आहे. त्यांची एकूण संख्या 844 एवढी आहे. 2016 साली आंदोलनानंतर बालरथ कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10 टक्के वाढ करण्यात आली.

आता बालरथ चालकाला 11 हजार तर साहाय्यकाला 5 हजार 500 रूपये पगार मिळतो. तोही व्यवस्थापनाकडून पाच-सहा महिन्यानंतर दिला जातो. या कर्मचाऱ्यांना जीवन जगण्याएवढे तरी वेतन नको का? असा प्रश्‍न स्वाती केरकर यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 Cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT