Winter In Goa: गोव्यात कडाक्याच्या थंडीने हुडहुडी

शेकोट्या पेटल्या : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीव्रता अधिक
Winter In Goa
Winter In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Winter In Goa: उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे ग्रामीण भागात लोक शेकोटी पेटवून बसलेले दिसतात. शिवाय स्वेटर, मोजे, कानटोपी, असा गरम पेहराव करताना लोक दिसत आहेत.

हुडहुडी भरवणाऱ्या या गुलाबी थंडीमुळे जानेवारीमध्ये उष्म्यामुळे हैराण होणाऱ्या गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जत्रा, काले, व धालोत्सवांना सुरुवात झाली असून नागरिकांना या बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे.

विशेष करून थंडीमुळे पडणाऱ्या धुक्याचा त्रास रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण, डोंगराळ भागात धुके पडल्याने रस्त्यावर वाहने चालवताना चालकांना अक्षरश: कसरत करावी लागते. राज्यात थंडी, खोकला, पडसे, घसा बसणे, त्वचा फुटणे, अशा आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

गोवा वेधशाळेच्या वैज्ञानिकांच्या मते, पुढील आठवडाभर राज्यातील वातावरण कोरडे राहील. तसेच राज्यातील काही भागांत धुके पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत पणजीत कमाल 31.8 अंश सेल्सिअस, तर किमान 17.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

Winter In Goa
Goa Government: मोफत शौचालयासाठी आता ऑनलाईन सेवा

डॉक्टरांचा सल्ला

राज्यात वाढणाऱ्या थंडीमुळे अनेक लोक आजारी पडत आहेत. या काळात लोकांनी आरोग्याची काळजी घेणे जरूरीचे आहे. नागरिकांनी शक्यतो उकळून गार केलेले पाणी प्यावे. तेलकट पदार्थ टाळावेत. संतुलित आहार घ्यावा. योग्य व्यायाम करावा तसेच शीतपेय व आईस्क्रीम आदी पदार्थ टाळण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

Winter In Goa
Goa Government: आता शिपायाची नोकरीसुद्धा आयोगाकडूनच!

राज्यात पुढील आठवडाभर अशीच थंडी राहणार असून शुक्रवारी किमान तापमानात 1 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा 1 ते 2 अंशांनी किमान तापमानात घट होणार आहे.

यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक थंडी असून गेल्या वर्षी जानेवारीत केवळ एकदाच तापमान 17 अंशांवर आले होते. मात्र, यंदा 10 व 12 जानेवारी रोजी 17 अंशांवर तापमान आले आहे. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक थंडी असल्याचे निदर्शनास येते. -एम. राहुल, वैज्ञानिक, वेधशाळा गोवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com