Valpoi Municipality Dainik Gomantak
गोवा

वाळपई पालिकेच्या कामगारांना वेळेत पगार मिळेना !

प्रसंगी कामावर बहिष्कार घालण्याचा कामगारांचा इशारा

दैनिक गोमन्तक

वाळपई: वाळपई नगरपालिकेच्या कामगार वर्गाला वेळेत पगार मिळल्याच्या कारणावरुन कामगारांनी पालिकेच्या प्रशासकीय कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. जर सोमवारी 11 जुलै रोजी पगार दिला नाही तर मंगळवार पासून कचरा उचलण्याचे काम करणार नसल्याचे स्पष्ट संकेत आज शनिवारी वाळपई पालिका कामगारांनी दिले आहेत.

(workers of valpoi Municipality did not get their salaries on time)

दर महिन्याला दिला जाणारा पगार एरव्ही 1 तारखेला दिला जात होता. पण हल्लीच्या काळात महिन्याच्या 10 तारखे नंतर पगार दिला जातो. वेळेत पगार दिला जात नसल्याने कामगार वर्गाने नाराजीचा सूर काढला आहे. सद्या दर रोजचा सातशे रुपये प्रमाणे दिसवडा पगार दिला जातो. सुमारे 39 कामगार दररोजचा वाळपई शहरातील केर कचरा काढण्याचे काम करतात. सकाळी 7 ते सकाळी 11 व दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असे काम केले जाते. वाळपई पालिकेचे एकूण दहा प्रभाग आहेत.

वाळपई प्रमुख शहर रस्ता, दुकाने, वेळूस गावस, नाणूस, बेतकेकरवाडा अशा भागात जाऊन दररोज कचरा गोळा करण्याचे काम कामगार करतात. कचरा गोळा करुन सय्यद नगरातील कचरा प्रकल्पावर कचरा एकत्र केला जातो. व तिथे कचर्याचे विविध भागात वर्गीकरण करुन वेगवेगळा केला जातो. व प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या पालिका कामगारांची कचरा साफ करण्यास महत्वाची भुमिका आहे. आज शनिवारी सकाळी काम करण्यात आले. सायंकाळी सर्व कामगार पालिका उद्यानात एकत्र आले होते. व वरील इशारा पालिका दिला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नूसार वाळपई पालिकेने सोमवारी पगार दिला जाईल असे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT