Goa News |Books Dainik Gomantak
गोवा

वाचन संस्कृती युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य; ‘वाचनालय तुमच्या दारी’

पणजी येथील कृष्णदास शामा राज्य मध्यवर्ती वाचनालयाचा विधायक उपक्रम

दैनिक गोमन्तक डिजिटल

युवा पिढीची वाचनालयांकडची ओढ कमी होत आहे. हीच कमतरता भरून काढण्यासाठी कृष्णदास शामा केंद्रीय वाचनालय पणजीद्वारे ‘वाचनालय तुमच्या दारी’ ही संकल्पना वापरून वाचन संस्कृती युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू केले.

2017 साली रोटरी क्लब, एसीजीएलद्वारे वाचनालयाला एक बस देण्यात आली. या फिरत्या वाचनालय बसमध्ये एकून 5 हजार पुस्तके असतात. ही पुस्तके घेऊन विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयांत जातात.

गोमंतकीय भूमीला ज्याप्रमाणे कलेची परंपरा आहे, त्याचप्रमाणे शिक्षणाची आणि वाचनाचीदेखील समृद्ध परंपरा आहे. गेल्या कित्येक दशकांपासून वाचनालयांच्या माध्यमातून येथील वाचन संस्कृती टिकून आहे.

परंतु आता काळ बदलला पुस्तकांच्या जागी मोबाईल प्रत्येक युवकाच्या, मुलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हातात दिसू लागला. त्यामुळे बंद कपाटातील ग्रंथ वाचकांची वाट पाहू लागले आहेत.

पुस्तकांच्या निवडीत होतो बदल

जर फिरते वाचनालय हे एखाद्या शाळेत जात असेल तर प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने बालगीते, बालकविता संग्रह तसेच माहितीपर पुस्तके सोबत नेली जातात. उच्च माध्यमिक, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कादंबऱ्या, विश्‍वकोश तसेच इतर पुस्तके जी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्‍यक असतात ती त्यांना विशिष्ट कालखंडासाठी वाचनासाठी पुरविली जातात व नंतर पुन्हा वाचनालयात आणली जातात.

उत्तम प्रतिसाद

कोरोना काळात शाळा बंद असल्याने उपक्रम राबवता आला नाही; परंतु आता शाळा सुरू झाल्याने आमच्या शाळेत फिरते वाचनालय घेऊन या, अशी मागणी येते त्यावेळी आम्ही पुस्तके घेऊन जात असतो. महाविद्यालयांमधूनदेखील फिरते वाचनालय घेऊन येण्याची मागणी होते. त्यावेळी वाचनालय कर्मचाऱ्यांद्वारे फिरते वाचनालय विद्यार्थ्यांपर्यंत जात असते. दिवसेंदिवस या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

फिरते वाचनालय या उपक्रमाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. अनेक विद्यालये, महाविद्यालये फिरते वाचनालय घेऊन येण्याची मागणी करत आहेत. ज्यावेळी फिरते वाचनालय घेऊन आम्ही जातो त्यावेळी आम्ही वाचनाचे महत्त्व, वाचन का गरजेचे आहे हे आम्ही विद्यार्थ्यांना पटवून देत असतो. राज्यात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी हा उपक्रम मोलाचे योगदान देत आहे.

- सुलक्षा कोळमुळे, साहाय्यक राज्य ग्रंथपाल, कृष्णदास शामा केंद्रीय वाचनालय, पणजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT