Babush Monserrate : ‘जी-२०’साठी काम बंद ठेवल्यास आणखी विलंब होणार : मोन्सेरात

बांधकाम सुरूच ठेवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना भेटून करणार
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak

राज्यात ‘जी-20’ परिषदेच्या बैठका होणार असून त्यासाठी पणजी स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेली काम बंद केल्यास ठरलेल्या वेळेत ती पूर्ण होणार नाहीत.

जी - 20 परिषदेला येणारे प्रतिनिधी पणजी शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करणार नसल्याने कपडा किंवा स्क्रीन लावून बांधकाम लपवता येईल. तसेच बांधकाम सुरूच ठेवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली.

Babush Monserrate
सरदेसाईंकडून पार्किंग प्लाझाची प्रतिकात्मक पायाभरणी

स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत बैठक झाली. बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल आणि पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात उपस्थित होते.

बांधकाम बंद केल्यास ते पुन्हा सुरू करण्यात आणखी विलंब होणार आहे. नंतर काही व्यक्ती आमच्यावरच टीका करणार आहेत. त्यासाठी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी कामे सुरूच ठेवणे आवश्‍यक आहे.

सांतिनेज येथील काकुलो मॉल ते टोंक येथील इंटरनॅशनल हॉटेल रस्ता 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच स्मार्टसिटी अंतर्गत कामे होत असून ही कामे सार्वजनिक बांधकाम, विद्युत, मलनिःसारण सारख्या खात्यांना देण्यात आले आहे, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

पणजीतील रस्त्यांची कामे हाती घेतली असून पुढील 30 वर्षे पुन्हा रस्त्यांचे खोदकाम केले जाणार नाही. पणजीतील रस्त्यांचे काम करणारे कामगार कामासंदर्भात जुगाड करत असल्याने निदर्शनास आले असून त्यांच्यावर योग्यरीत्या कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com