Goa Traffic Rules: उत्तर गोव्याचे SP म्हणतात 'धीरे चलें सुरक्षित रहें'! व्हिडिओ शेअर करत दिला वाहतूक नियम पाळण्याचा सल्ला

पोलीस अधीक्षक निधीन वल्सन यांनी अनोख्या पद्धतीने वाहतूक नियम पाळण्याचा सल्ला गोवेकरांना दिला आहे.
Viral Video |Accidents in Goa
Viral Video |Accidents in GoaDainik Gomantak

Goa Traffic Rules : नवीन वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यात गोव्यातील रस्ते अपघातात कमालीची वाढ दिसून आली. या वाढत्या घटनांनी सरकारची डोकेदुखी तर वाढवलीच; मात्र गोवेकरांच्या चिंतेतही भर टाकली. यानंतर अपघातांमागील कारणांचा मागोवा घेताना अनेक तर्क-वितर्क काढण्यात आले.

अपघातांचे मुख्य कारण म्हणजे वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्याचे सांगण्यात आले. याचसंदर्भात उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वल्सन यांनी अनोख्या पद्धतीने वाहतूक नियम पाळण्याचा सल्ला गोवेकरांना दिला आहे.

Viral Video |Accidents in Goa
Babush Monserrate : ‘जी-२०’साठी काम बंद ठेवल्यास आणखी विलंब होणार : मोन्सेरात

अधीक्षक निधीन वल्सन यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर अचानक मध्ये एक कुत्रा येतो, त्यामुळे एका बाजूने येत असलेली लाल रंगाची चारचाकी आपला वेग हळू करते.

मात्र कारच्या मागून येणारी दुचाकी कारवर येऊन जोरदार धडकते आणि दुचाकीस्वार त्या धक्क्याने कारच्या बोनेटवर येऊन आदळतो.

वेग नियंत्रित न केल्याचा परिणाम या व्हिडिओमधून स्पष्ट कळत आहे. हा व्हिडिओ उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वल्सन यांनी त्यांच्या ट्विटर वॉलवर शेअर केला आहे.

त्याखाली त्यांनी लिहिले आहे की, "वेगामुळे रस्त्यावर वाहन चालताना घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वेग हळू करा आणि जीव वाचवा. लक्षात ठेवा, कधीही न येण्यापेक्षा उशीरा पोहोचणे चांगले."

इथे पहा हा व्हायरल व्हिडिओ :

शिवाय त्यांनी असेही म्हटले आहे की #धीरे_चलें_सुरक्षित_रहें.. यातून गोवेकरांना त्यांनी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे; जेणेकरून अतिवेगामुळे होणारे अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंवर आळा बसेल.

दरम्यान, गोव्यात 2021 च्या तुलनेत 2022 आणि 2023 मध्ये अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. 2023 च्या पहिल्या 48 दिवसात तर 50 हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

माहितीनुसार राज्यातल्या या वाढत्या घटनांचे कारण म्हणजे वाहनचालकांचा बेशिस्तपणाच असल्याचे समोर आले आहे. यावर आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीदेखील भाष्य केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com