Panjim Smart City:  Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम रेंगाळले

27 कोटी खर्च : पाटो येथील बोटॅनिकल गार्डनसह बाल उद्यानाचे काम धिम्या गतीने

दैनिक गोमन्तक

Panjim Smart City: इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) पाटो परिसरात हाती घेतलेला 15 हजार चौरस मीटरमधील प्रकल्पाचे काम संथ गतीने चालले आहे. बोटॅनिकल गार्डनसह बाल उद्यानाची येथे निर्मिती होत आहे.

ऑगस्ट २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षीत होते, परंतु ज्या गतीने ते काम सुरू आहे, ते पाहता त्याला आणखी पाच-सहा महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता दिसू लागली आहे.

पणजीत चांगली कनेक्टिव्हिटीसह वेगळे पदपथ, मनोरंजन क्षेत्र निर्माण करण्याचे काम आयपीएससीडीएल करीत आहे. पाटो येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत १५ हजार चौ. मीटरवर २७ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत हाती घेतला आहे.

मात्र या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, या कामाच्या विलंबाबाबत व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिग्स यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॉल स्वीकारला नसल्याने विलंबाचे कारण समजू शकले नाही.

नेवगीनगर, फोंताईन्हास, मळ्यातील नागरिकांसाठी उपयुक्त

नेवगीनगर, फोंताईन्हास आणि मळा येथील नागरिकांसाठी हे ठिकाण उपयुक्त ठरणार आहे. कारण या ठिकाणी मुलांसाठी खेळण्याची सोय असल्याने पणजीतून तसेच इतर ठिकाणाहूनही मुले या ठिकाणी येतील, अशी आशा आहे. त्याशिवाय वृक्षारोपण करण्यात येणार असल्याने हा परिसर हिरवागार असणार आहे.

या परिसरात सुरवातीला कचरा टाकला जात होता, परंतु आर्थिक विकास महामंडळाने (ईडीसी) पाटोवरील ही जागा परिसराचा विकास करण्यासाठी आयपीएससीडीएलकडे दिली होती. आता पाटो परिसराचा ताबा महानगरपालिकेकडे आला आहे. बोटॅनिकल गार्डनसह मुलांसाठी खेळण्यासाठी हा पार्क तयार केला जाणार आहे. त्याशिवाय अंतर्गत भिंतीवर चढण्याचा धाडसी खेळ याठिकाणी उपलब्ध असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT