Architecture College: ‘आर्किटेक्चर’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

दुसऱ्या दिवशीही वर्गावर बहिष्कार तोडग्यासाठी भेटणार मुख्यमंत्र्यांना
Architecture College
Architecture CollegeDainik Gomantak

Goa college of Architecture: गेल्या एक वर्षांपासून ५० हुन जास्त विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर महाविद्यालयाकडून कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा(सीओए) रजिस्ट्रेशन क्रमांक अजूनही देण्यात न आल्याने मंगळवारीही विद्यार्थ्यांनी वर्गांवर बहिष्कार टाकत आपले आंदोलन सुरूच ठेवले. या प्रकरणी लवकरच आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत,असे आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले.

Architecture College
Michael Lobo: कांदोळीत लवकरच आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत

पत्रकारांशी बोलताना विद्यार्थी म्हणाले की, त्यांना पुढे काम करण्यासाठी रजिस्ट्रेशन क्रमांक ही अत्यंत आवश्यक गोष्ट असूनही त्यांना तो क्रमांक न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. 

एका विद्यार्थ्याने नमूद केले की या महाविद्यालयात २५०हून अधिक विद्यार्थी शिकत असून ५० हून जास्त विद्यार्थ्यांना  रजिस्ट्रेशन क्रमांक अजूनही देण्यात  आलेला नाही.

Architecture College
Goa Murder Case: बेळ्‍ळारी खून प्रकरणातील कोयता शोधण्‍याचे आव्‍हान

जोपर्यंत प्राचार्यांकडून याविषयी ठोस स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत हा बहिष्कार सुरूच राहिल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांनी सांगितले की, ‘सीओए’चा रजिस्ट्रेशन क्रमांक नसेल तर ही पदवी असूनही वैध धरली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मानसिक दडपण आले आहे. अनेकदा प्राचार्यांना या ‘सीओए’ क्रमाकांबाबत विचारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थी मुख्यमंत्र्यांना भेटून या विषयावर तोडगा काढण्याचा विचार करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com