Goa Congress Womens March Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: राजकीय अधिकार, आर्थिक सशक्तीकरण आणि कोलकाता खून प्रकरणी ‘नारी न्याय आंदोलन’

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: महिलांना राजकीय अधिकार, आर्थिक सशक्तीकरण आणि बंगालमध्ये खून झालेल्या डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या महिलांशी संबंधित मागण्यांसाठी प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने शनिवारी पणजीत ‘नारी न्याय आंदोलन’ मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस भवनापासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांच्या अध्यक्षतेखाली निघालेल्या या मोर्चात राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. मोर्चाविषयी माहिती देताना नाईक म्हणाल्या, काँग्रेसच्या दिल्लीमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अधिवेशनात महिलांच्या आरक्षणाचा विषय प्रामुख्याने मांडण्यात आला.

महिलांना राजकारणात स्थान मिळाले पाहिजे. कारण त्या राजकारणात आल्या, तर महिलांसाठी ही सुरक्षिततेची बाब बनेल. महिला आपले मुद्दे प्रामुख्याने मांडू शकतील. त्याचबरोबर वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्यांना जगणेही मुश्‍किल झाले आहे. भाजप सरकारला महागाईवर आळा घालण्यात अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला.

त्याचबरोबर कोलकाता येथे झालेल्या डॉक्टर युवतीच्या खुनाचे पडसाद अजूनही देशभर उमटत आहेत. एका प्रशिक्षीत डॉक्टर युवतीच्या खुनाची घटना अत्यंत निंदनीय आहे. त्या युवतीला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्यातील आरोपीला जाहीर फाशी द्यावी अशीही आम्ही मागणी करतो.

राजस्थानध्येही युवतीवर झालेल्या अत्याचाराची घटना पाहता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मुझफ्फरनगर येथील नववीतील युवतीला घरातून उचलून नेऊन सामूहिक बलात्कार करून तिचा निघृण खून करण्यात आला. ज्या-ज्या जागी भाजपचे डबल इंजिन सरकार आहे, तेथे महिलांवर अत्याचार घडत आहेत, असे नाईक यांनी सांगितले.

महिला काँग्रेसच्या प्रमुख मागण्या

महिलांना हवा राजकीय अधिकार

आर्थिक सशक्तीकरण

खून झालेल्या डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांना न्याय द्यावा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

का साजरा करतात 'World Heart Day'? हृदयविकारांचे प्रकार आणि 'कोरोना'नंतर वाढलेल्या शस्त्रक्रियांमागची कारणे जाणून घ्या

FC Goa: 'हेर्रेरा'ची सामन्यानंतरही दिलदार कामगिरी! ईस्ट बंगालच्या चाहत्यांप्रती केला 'असा' आदर व्यक्त; म्हणाला की..

Goa Recruitment: सुवर्णसंधी! तरुणांनो लागा तयारीला, 'या' सरकारी विभागात होणार मेगा भरती

Mandrem Panchayat: मांद्रेत डोंगरकापणी रोखणार! नवनिर्वाचित सरपंचांचा विश्वास

Margao News: पावसामुळे कोकण रेल्वे उड्डाणपुलावरील रस्ता परत खराब! नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची लोकांची मागणी

SCROLL FOR NEXT