Mandrem News Dainik Gomantak
गोवा

Mandre News: महिलांचे तडफदार पोवाडा गायन

मांद्रे मतदारसंघातील महिलांसाठी खास ‘पोवाडा गायन स्पर्धे’चे आयोजन केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पोवाडा म्हणजे "वीरांच्या पराक्रमांचे, बुद्धिमत्तेचे तसेच सामर्थ्य, गुण, कौशल्ये इ. गुणांचे काव्यात्मक वर्णन. प्रशस्ती किंवा स्तुतिस्तोत्र  म्हणजे पोवाडा. इतिहासात तसेच वर्तमानकाळातदेखील, पोवाडा हा पुरुषांनी गावा असाच संकेत आहे.

मात्र मोरजी येथील श्री दत्त महिला मंडळाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्ताने या मंडळाने मांद्रे मतदारसंघातील महिलांसाठी खास ‘पोवाडा गायन स्पर्धे’चे आयोजन केले होते.

आणि या स्पर्धेत अनेक गटांनी सहभाग दर्शवून विरश्रीयुक्त पोवाडे सादर केले व पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या प्रकारात ‘हम भी कुछ कम नही’ हेच सिद्ध केले.

पोवाडा गायन स्पर्धेतून महिला गायकांना संधी देण्याचा उपक्रम राबवून या मंडळाने एक चांगला पायंडा घातला. आपापल्या पोवाडा सादरीकरणामधून शूरवीरांची गाथा स्त्रियांनी तडफदारपणे सादर केली. त्यांच्या या गायनाला उपस्थितांनीही उदंड प्रतिसाद दिला.

हिरकणीच्या धाडसाची व  मातृप्रेमाची कथा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अधिराज्य करते. हिरकणीची ही धाडस कथा श्री दत्त महिला मंडळाने आपल्या पोवाड्यातून सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

त्याशिवाय ‘अफजल खान-शिवाजी’ प्रसंग, कोंडाणा किल्ला जिंकण्याची कथा, बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीतील लढाईत गाजवलेला अतुलनीय पराक्रम व त्यांचे बलिदान, छत्रपती संभाजी महाराजांनी पराजित राहून लढलेल्या एकूण 210 लढाया, मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई- राजमाता जिजाबाई किंवा जिजाऊ अशा विविध ऐतिहासिक घटनांवर आणि व्यक्तींवर या स्पर्धेत पोवाडे गायले गेले.

स्पर्धकांच्या वेषभूषेने, त्यांच्या गायनातल्या आवेशाने, त्यांच्या सादरीकरणाने स्पर्धेच्या ठिकाणी प्रेरणादायक असे ऐतिहासिक वातावरण तयार झाले होते.

या पोवाडा गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्री सत्पुरुष महिला मंडळ- मोरजी यांना प्राप्त झाले. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सिद्धारूढ ग्रुप- मांद्रे तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सरकारी प्राथमिक विद्यालय- पालक-शिक्षक संघ यांना लाभले. काळोबा सेल्फ हेल्प ग्रुप- मोरजी आणि दाडोबा महिला सेल्फ हेल्प ग्रुप यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्याच्या वाढीचा मार्ग मोकळा, आता 63 टक्के DA मिळण्याची शक्यता; जाणून घ्या गणनेचे सूत्र

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

SCROLL FOR NEXT