Goa University: गोवा विद्यापीठात‘एनएसयूआय’ची निदर्शने

कंपनीने नेमलेले सुरक्षा रक्षक हे प्रशिक्षित नाहीत
Goa University
Goa UniversityDainik Gomantak

गोवा विद्यापीठात काही दिवसांपूर्वी एका इसमाने गैरवर्तन केल्याने त्यासंबंधीची तक्रार विद्यापीठातील अंतर्गत तक्रार समितीला देण्यात आली होती. मात्र, त्यांनी योग्य ती कारवाई न केल्याने ‘एनएसयूआय’तर्फे गोवा विद्यापीठात सोमवारी निदर्शने करण्यात आली.

यासंबंधी सांगताना अध्यक्ष नौशाद चौधरी म्हणाले, गोवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी विद्यापीठाने हलगर्जीपणा करणे चुकीचे असून अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच, गोवा विद्यापीठात सुरक्षेचे काम खासगी व्यवस्थापनाला दिले आहेत.

परंतु कंपनीने नेमलेले सुरक्षा रक्षक हे प्रशिक्षित नाहीत. ते स्थानिकही नसल्याने ते अनेकदा घाबरतात. त्यामुळे गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक विद्यापीठात करावी.कारण ते प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आहेत.

तसेच विद्यापीठ संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, तसेच बाहेरील आवारातही तसे कॅमेरे लावण्याची गरज आहे. तसेच विद्यापीठात असलेली अंतर्गत तक्रार निवारण सिमिती कार्यरत होणे गरजेचे असून कुलगुरूंनी या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखविल्याचे नौशाद चौधरी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com