मांद्रे: जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (०८ मार्च) उत्साहात साजरा केला जात आहे. गोव्यात महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दोन हजार महिलांसाठी खास चिकनचा बेत केला. विशेष बाब म्हणजे त्यांनी स्वत: महिलांसाठी ही चिकन डिश तयार केली.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार जीत आरोलकर स्वत: चिकन बनवत असतानाचा एक व्हिडिओ सध्या गोव्यात चर्चेचा विषय ठरला आहे. आरोलकर मोठ्या टोपात चिकन डिश तयार करताना दिसत आहेत. व्हिडिओत तीन टोप दिसत असून, एका टोपात चिकन, एकात भात अथवा बिर्याणी शिजताना दिसत आहे. आमदार आरोलकर स्वत: तयार केलेल्या या डिशची चव चाखताना दिसत आहेत. यावेळी उपस्थित नागरिक देखील याची चव चाखताना व्हिडिओत दिसत आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने आमदार आरोलकरांनी चिकनचा बेत केल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन हजार महिलांसाठी ही चिकश डिश तयार केल्याची माहिती आहे. दरम्यान, महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. 'आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, प्रत्येक स्त्री आणि मुलीला स्वप्न पाहण्याची, ती साध्य करण्याची आणि नेतृत्व करण्याची शक्ती देणारे जग निर्माण करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी करुया'
"सर्व महिला आणि मुलींसाठी: हक्क. समानता. सशक्तीकरण, अशी या वर्षीची थीम आहे. आव्हानांवर मात करण्यासाठी, विविध संधी निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येकाला सन्मानाने आणि निष्पक्षतेने वागवले जाईल असे भविष्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा देते."
"गृहिणी ते विमान पायलटपर्यंत, शिक्षक ते नोकरी करण्यापर्यंत महिला प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांना पाठिंबा आणि सक्षम करण्याची शपथ घेऊया!", अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.