Soyara Mohite Success Story: स्त्रीशक्तीच्या स्वप्नदूत ‘सोयरा मोहिते’, महिलांच्या कर्तृत्वाचे ‘सोयराज’ रेस्टॉरंट; महिला दिन विशेष

Women's Day 2025: पणजी शहरातील पाटो परिसरातील दोन यशस्वी रेस्टॉरंट्सच्या मालकीण, सोयरा शंतांदू मोहिते यांची कथा एका महिलेच्या धाडसाचे, मेहनतीचे आणि सातत्याचे सजीव उदाहरण आहे.
Women entrepreneurs in Goa
Soyara Mohite Success StoryDainik Gomantak
Published on
Updated on

Women's Day 2025 Soyara Mohite Success Story Women Entrepreneurship Goa

यशवंत सावंत

पणजी: पणजी शहरातील पाटो परिसरातील दोन यशस्वी रेस्टॉरंट्सच्या मालकीण, सोयरा शंतांदू मोहिते यांची कथा एका महिलेच्या धाडसाचे, मेहनतीचे आणि सातत्याचे सजीव उदाहरण आहे. १९९८ साली गोव्यात आलेल्या सोयरा यांचे पती येथे व्यवसाय करत होते. नव्या ठिकाणी, नव्या शहरात, जवळपास कुणी मैत्रीण नाही, वेळ घालवण्यासाठी काहीच काम नाही. अशा स्थितीत त्यांनी स्वतःसाठी एक नवा मार्ग निवडण्याचा निश्चय केला आणि आज त्या ‘सोयराज’ या रेस्टॉरंटच्या मालकीण आहेत.

सोयरा यांचे पती शंतांदू यांनी त्यांना मनापासून पाठिंबा दिला आणि ‘तुला जे योग्य वाटेल ते कर’ असे सांगून त्यांना स्वप्नांच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. २००२ मध्ये सोयरा यांनी शाळेतील मुलांना टिफिन पुरवण्याचे काम सुरू केले. त्यांच्या हाताला असलेली चव आणि मेहनतीमुळे कामाची मागणी वाढू लागली. हळूहळू व्यवसाय विस्तारत गेला आणि २००५ मध्ये त्यांनी पाटो-पणजी येथे व्यावसायिकरीत्या पहिले रेस्टॉरंट (Restaurant) सुरू केले. आज त्यांच्याकडे दोन रेस्टॉरंट्स आहेत आणि सोयरा यांच्या हाताखाली १५ महिला आनंदाने आणि विश्वासाने काम करत आहेत.

Women entrepreneurs in Goa
Women's Day 2025: स्त्री आरोग्य हा केवळ तिचा हक्क नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी

दरम्यान, महिला दिनाच्या निमित्ताने सोयरा शंतांदू मोहिते यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक महिलेने, प्रत्येक उद्योजिकेने आणि प्रत्येक स्वप्न बघणाऱ्याने वाचावा. कारण ही कथा केवळ व्यवसायाची नाही, तर एका महिलेने स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी दिलेल्या लढ्याची आहे. सोयरा यांचे यश केवळ त्यांचे नाही, तर प्रत्येक महिलेला (Women) उभारी देणारे आहे. त्यांच्या कष्टातून आणि यशातून अनेक महिलांना नवी प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून इतर महिलांनीदेखील यशाच्या शिखरावर पोहोचावे, हीच खरी महिला दिनाची प्रेरणा आहे.

प्रशिक्षक, मार्गदर्शकाची भूमिका

आजच्या काळात व्यवसायामध्ये वाढती स्पर्धा आहे. ‘सोयराज’च्या रेस्टॉरंटसमोरच इतर रेस्टॉरंट्स आहेत. त्यामुळे स्पर्धादेखील वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण कसे टिकावे आणि काय करावे हे सोयरा त्यांच्या कर्मचाऱ्यांना स्वतःहून शिकवतात, समजावतात आणि व्यवसायाला सातत्याने नवी दिशा देतात.

सोयरा यांच्या मते, व्यवसायात फायदा एकदम मिळत नाही. संयम ठेवला, कष्ट घेतले आणि सातत्य राखले तरच आपल्याला कष्टाची फळे मिळतात. आजच्या तरुणाईला त्यांचा एकच संदेश त्या देतात आणि तो म्हणजे ‘लगेच नफा मिळेल अशी अपेक्षा न ठेवता मेहनत आणि सातत्य ठेवा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल.’

Women entrepreneurs in Goa
Women's Day 2025: गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी पोर्तुगीजांशी संघर्ष करणारी 'रणरागिणी', सुधाताई जोशी यांची प्रेरणादायी कथा

प्रोत्साहन देण्याचे ध्येय

1 ‘सोयराज’ रेस्टॉरंट खास महिलांकडूनच चालवले जाते. महिलांसोबत काम करणे सोपे असले तरी त्यांच्या समस्याही असतात; पण त्या समस्या मला समजतात; कारण मीदेखील त्याच परिस्थितीतून गेले आहे, असे सोयरा सांगतात.

2 महिलांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना स्थैर्य मिळवून देणे हे सोयरा यांचे ध्येय आहे. ज्यावेळी काही महिला काम सोडून जातात, त्यावेळी ‘जेव्हा परत यावेसे वाटेल, तेव्हा मला नक्की कळव’ असे स्वतः सोयरा त्यांना सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com