Goa Politics: ‘डबल इंजिन’ सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरले आहे. लोकांना जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असे महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बीना नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जीवनावश्यक वस्तू वाजवी दरात उपलब्ध करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
त्या म्हणाल्या, देशात काँग्रेसची सत्ता असताना भाजपची ब्रिगेड आम्हाला एलपीजीची किंमत तेव्हा ४१० रुपये असूनही लक्ष्य करायची, पण त्यांच्या राजवटीत हा दर ९१७ रुपये झाला, तेव्हा ना पंतप्रधान नरेंद्र मोदी, ना त्यांच्या ‘जुमला’ ब्रिगेड काही बोलत आहे.
त्यांनी महागाईवर एकच शब्द उच्चारावा, असे माझे त्यांना आव्हान आहे. केवळ निवडणुकीच्या वेळी ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी दर कमी करतात. गोव्यातील भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीत तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही.
भाजप सरकारकडे त्यांच्या पक्षाचा प्रचार करणाऱ्या कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी पैसे आहेत, परंतु महागाई कमी करण्यासाठी हस्तक्षेप योजनेवर खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशी टीका करून त्या म्हणाल्या, डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर महाग झाले आहेत,
पण भाजप सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. भाजप महागाईवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अनेक मुद्द्यांचा वापर करत आहे, लोकांना याची जाणीव आहे आणि मला खात्री आहे, की गरीब आणि मध्यमवर्गीय त्यांना निवडणुकीच्या वेळी योग्य धडा शिकवतील.
महागाई वाढली!
लिबरेटा मदेरा, लक्ष्मी चव्हाण, सुचिता ठक्कर, क्लारा डाकुन्हा, जॉनिता सौझा, अनुराधा नाईक, फातिमा पॅरेरा, झरीना शेख, सॅलेट मिरांडा आणि लविनिया डिकॉस्ता या महिला काँग्रेसच्या सदस्यांनी वाढत्या किमतींबद्दल भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपच्या राजवटीत प्रचंड महागाई वाढली असून तूरडाळ, तांदूळ, लसूण, लिंबू आदींचे भाव गगनाला भिडल्याचे त्या म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.