Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठात महिला, विद्यार्थिनी असुरक्षित

अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ : महिला प्राध्यापकाला दिली उघड धमकी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa University गोवा विद्यापीठात शिकणाऱ्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर अन्याय होतोय, अशा मुली आपले शिक्षण पूर्ण करण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून हे अत्याचार निमूटपणे सहन करत आहेत, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.

हल्लीच एका महिला फॅकल्टीला मद्यप्राशन करून आलेल्या दुचाकीस्वारांनी धमकावण्याचा प्रकार कॅम्पसमध्ये घडला आहे. हा प्रकार अनेक मुलींबाबतही उघडकीस आला आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखी कुठलीही अद्ययावत यंत्रणा नाही. कोविड महामारी संपल्यानंतर दररोज अनेक वाहने विद्यापीठ कॅम्पसबाहेर उभी केलेली आढळतात. ती नेमकी कशासाठी असतात व कोण येते-जाते, याचा कुणालाही थांगपत्ता नसतो. यातून अनेक गैरप्रकार घडत असल्याचे बऱ्याच प्राध्यापकांनी पाहिले आहे. मात्र, उघडपणे सांगण्याचे धाडस कुणीही करत नाही..

वसतिगृहात सहज प्रवेश!

विद्यापीठाच्या जागेवर बांधलेले डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम खासगी एजन्सीला भाडेतत्त्वावर दिले आहे, जिथे व्यावसायिक हिताचे खुले कार्यक्रम सर्रास आयोजित केले जातात, ज्यात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या भव्य पार्ट्यांचाही समावेश असतो.

प्रवेशद्वार नसलेल्या कॅम्पसमध्ये खासगी वाहनांची गर्दी अनेकवेळा दृष्टीस पडते. अनेकदा वाहनांची लांबच लांब रांग युनिव्हर्सिटी शॉपिंग सेंटरजवळ लागलेली दिसते, जिथून महिलांच्या वसतिगृहात कुणाच्याही लक्षात न येता जाणे सहज सोपे आहे.

कायमस्वरूपी वॉर्डनच नाही : सर्वांत चीड आणणारी गोष्ट म्हणजे, विद्यापीठात कायमस्वरूपी वसतिगृह वॉर्डन नाहीत, अगदी स्थापनेपासून. वसतिगृहे महिला प्राध्यापकांद्वारे चालवली जातात. त्या बिचाऱ्या प्राध्यापकांनी शिकवायचे की, वॉर्डन म्हणून काम पाहायचे?

वेळ कसा व कधी द्यायचा? प्राध्यापक म्हणून शिकवण्यासाठी वेळ द्यायचा की, वसतिगृहाच्या व्यवस्थापनासाठी वेळ द्यायचा? त्यामुळे येथे पूर्णवेळ वॉर्डन अत्यावश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT