Dainik Gomnatk

गोवा

स्वावलंबी बनण्‍यासाठी महिलांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा: विश्वजीत राणे

महिलांनी स्वावलंबी बनण्‍यासाठी आणि स्वयंसाहाय्य गटांनीही सरकारी योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन महिला आणि बालकल्याण खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

दैनिक गोमन्तक

पर्ये: सरकारच्‍या विविध योजना आता सुटसुटीत झाल्‍या असून स्वावलंबी बनण्‍यासाठी महिलांनी त्‍यांचा लाभ घ्‍यावा. या योजनांमध्ये काही त्रुटी होत्या, त्या दूर करण्‍यात आल्‍या आहेत. स्वयंसाहाय्य गटांनाही त्‍याचा फायदा होणार आहे. महिला आणि बालकल्याण खाते आता वरच्या स्तरावर पोचले असून आणखीही काही योजना विचाराधीन आहेत, असे प्रतिपादन महिला आणि बालकल्याण खात्याचे मंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) यांनी केले. पर्ये-सत्तरी येथे काल रविवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या महिला मेळाव्‍यात राणे बोलत होते.

या मेळाव्‍याला पर्ये मतदारसंघातील सहा पंचायत क्षेत्रांमधून सुमारे तीन हजार महिला उपस्थित होत्‍या. व्‍यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महिला आणि बालकल्याण खात्याच्या संचालक दीपाली नाईक, उपसंचालक ज्योती देसाई, वाळपई बाल सर्वांगीण विकास योजना प्रकल्प अधिकारी छाया कडकडे, केरीचे सरपंच दाऊद सय्यद, मोर्लेच्‍या विद्या कासार, पर्येचे सका सावंत, होंड्याचे आत्माराम गावकर, पिसुर्लेच्‍या जयश्री परब, उपसरपंच आणि मान्‍यवरांची उपस्थिती होती. दरम्‍यान, या मेळाव्यात खात्याअंतर्गत स्वावलंबन योजना धनादेश मंजुरीपत्रे स्वयंसाहाय्य गटांना प्रदान केली.

विश्‍‍वजीत राणेंवर तानावडेंची स्‍तुतिसुमने!

सदानंद शेट तानावडे (Sadanand Tanawade) यांनी मंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या कार्याचा गौरव केला. त्‍यांनी आपल्‍या खात्यांची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली असून, कोविड काळात त्यांचे मोठे योगदान लाभल्‍याचे सांगितले. तसेच त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT