संशोधनावरील वर्गाचा ‘गिनिज रेकॉर्ड’; 1002 विद्यार्थ्यांना विश्वाचे आकलन

तब्बल एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला जगातील सर्वाधिक विद्यार्थी संख्येचा अवकाश संशोधनावरील वर्ग भरवून सोमवारी गिनिज विश्वविक्रम नोंदवण्यात आला.
Guinness World Records

Guinness World Records

Twitter/India International Science Festival

Published on
Updated on

Guinness World Records: येथे आयोजित सातव्‍या भारतीय विज्ञान महोत्‍सवात (India International Science Festival) पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्सचे (National Center for Radio Astrophysics) संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना रेडिओ खगोलशास्त्राची ओळख करून दिली. तब्बल एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला जगातील सर्वाधिक विद्यार्थी संख्येचा अवकाश संशोधनावरील वर्ग भरवून सोमवारी गिनिज विश्वविक्रम नोंदवण्यात आला.

<div class="paragraphs"><p>Guinness World Records</p></div>
‘टॉय बीच’ क्लबचे स्पष्टीकरण गोवा खंडपीठाने फेटाळले

विद्यार्थ्यानी किटच्या साहाय्याने जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (जीएमआरटी) मॉडेलही बनवले. पणजीत 11 ते 13 डिसेंबरदरम्यान केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय, गोवा सरकार आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्‍सव आयोजित करण्‍यात आला होता. आज पार पडलेल्या विश्वविक्रमात प्रा. गुप्ता यांनी उपस्थित 1002 शालेय विद्यार्थ्यांना विद्युत चुंबकीय लहरींच्या साहाय्‍याने विश्वाचे आकलन कसे केले जाते याविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना जीएमआरटी प्रकल्पाचे महत्त्‍वही सांगितले.

अवकाश संशोधनावरील विक्रमी संख्येच्या वर्गात विद्यार्थ्यांनी पुण्याजवळील जीएमआरटी या जगातील सर्वांत मोठ्या रेडिओ टेलिस्कोपचे मॉडेल ‘डू इट युवर सेल्फ किट’च्या साहाय्‍याने बनवले. एमडीएफ आणि पीव्हीसी फोमपासून तयार केलेले हे किट एनसीआरएच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील त्रिमिती, कुतूहल-संडे सायन्स स्कूल आणि संशोधन या संस्थांनी संयुक्तरित्या विकसित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com