Khandola  Dainik Gomanak
गोवा

Khandola News : महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे : साहित्यिक ज्योती कुंकळकर

Khandola News : तिवरे पंचायतीतर्फे महिलादिन साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

Khandola News :

खांडोळा, महिला या माझ्या अभिमानाचा, साहित्याचा आणि चित्रपटाचा एक केंद्रबिंदू आहे. पण दररोज महिलांसमोर आव्हाने असतात. त्यांना सकाळीपासून रात्री दिवा बंद करेपर्यंत अनेक कामे करावी लागत.

हा दिनक्रम सांभाळून आपले करिअर, नोकरी, संसार सांभाळून तिच्या समोर वेगवेगळी आव्हाने आहेत, तरीही महिलांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे, असे मत साहित्यिक ज्योती कुंकळकर यांनी व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या, महिलांसमोर सर्वांत महत्त्वाचे आव्हान आज आरोग्याचे आहे. त्यामुळे आज स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तिवरे-वरगांव ग्रामपंचायतीतर्फे आयोजित महिला दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर सरपंच जयेश नाईक, उपसरपंच सुमित्रा नाईक, श्रीमती रिना गोविंद गावडे, संजीव कुंडईकर, अर्पणा आमोणकर आणि शिल्पा वेरेकर उपस्थित होत्या.

रिना गावडे म्हणाल्या, गेली अनेक वर्षे आपण महिला दिन साजरा करतो. आज महिला कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीत. पण पुढे येण्यासाठी त्यांना कुटूंबाचा आधार आणि सहकार्य फार मोलाचे असते. सरपंच जयेश नाईक म्हणाले, महिलांचा सन्मान झाला पाहिजे. आपल्या पंचक्रोशीत अनेक महिला कार्यरत आहेत. आपली पंचायत त्यांना नेहमीच सहकार्य करते.

मान्यवरांच्या हस्ते गांवातल्या श्रेष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. स्वागत उपसरपंच सुमित्रा नाईक यांनी केले, तर सूत्रसंचालन सोनिया वेर्लेकर आणि संगीता म्हापणे, तर आभार संजना नाईक यांनी मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT