Women Dead Body found in Santa Cruz Dainik Gomantak
गोवा

सांताक्रूझमध्ये मेरशीतील विवाहितेची आत्महत्या; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घरच्यांची घटनास्थळी धाव

महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही

Kavya Powar

Women Dead Body found in Santa Cruz

मळा - सांताक्रुझ येथील चार खांबाजवळील मानसच्या ठिकाणी एका विवाहित महिलेचा मृतदेह खाडीत तरंगताना आढळून आला. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून तो गोमेकॉ इस्पितळात शव चिकित्सकेसाठी पाठवण्यात आला आहे.

हा मृतदेह बामणभाट - मेरशी येथील सपना मणेरकर (३७) हिचा असून तिने आज पहाटे साडेसहाच्या सुमारास आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसानी वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मानसिक तणावाखाली असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सपना मणेरकर ही सकाळी सहाच्या सुमारास स्वतःची दुचाकी घेऊन पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर निघाली. घरातील तिचे कुटुंब उठण्यापूर्वीच ती निघून गेली होती.

घरातील तिच्या कुटुंबातील सदस्य उठले तेव्हा ती नव्हती व तिची दुचाकीही नव्हती. त्यामुळे ती काही कामानिमित्त गेली असावी असा समज कुटुंबियांचा झाला. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नव्हती. तिच्या बेपत्ताबाबत पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्या आली नव्हती.

दरम्यान, एका महिलेचा मृतदेह मळा मानस येथील खाडीत तरंगत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला सकाळी १० च्या सुमारास देण्यात आली. पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक निखिल पालेकर हे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यात असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला.

या मृतदेहाचा व्हिडिओ व्हायरल होताच तिच्या कुटुंबियांना ओळखणाऱ्या लोकानी पोलिसांशी संपर्क साधला. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला व मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. कुटुंबियानी तिची ओळख पटविली. त्यानंतर मृतदेह गोमेकॉ इस्पितळात शव चिकित्सेसाठी पाठवण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सपना मणेरकर ही विवाहित असून तिला दोन मुली आहेत. गेल्या काही दिवसांपासून तिचे मानसिक संतुलन बिघडलेले होते त्यामुळे बरीच ताणाखाली होती. ती आज सकाळी अचानक कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडली.

दुचाकी घेऊन ती निघाली मात्र ज्या ठिकाणी तिचा मृतदेह सापडला तिथे दुचाकी सापडली नाही. दुचाकीचा शोध घेण्यात येत आहे. तिने आत्महत्या इतर ठिकाणी केली असावी व तिचा मृतदेह पाण्याच्या भरतीबरोबर तो मळा मानस येथे वाहत आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत पोलिसांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतचा 'पॉवर शो'! 102 मीटरचा षटकार ठोकत बनला नवा 'सिक्सर किंग', सेहवागचा रेकॉर्ड ब्रेक Watch Video

Goa Vs Rajasthan Tourism: पधारो म्हारो देस! संस्कृती दाखवणारे राजस्थानचे पर्यटन; गोव्याने ही कला शिकण्यासारखी..

Arambol: '..गावकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही'! आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलच्या जमीन रूपांतरणास कडाडून विरोध

Fake Liquor Racket: उसगाव बनावट दारू प्रकरण! दीड कोटींचा मुद्देमाल जप्त; अजून 3 जणांना अटक

अमेरिकेतून 'देसी गर्ल' 7 वर्षानंतर गोव्यात, मालक स्वतः हातात प्लेट घेऊन आला स्वागताला; Video Viral

SCROLL FOR NEXT