Ananya Bath Dainik Gomantak
गोवा

Women's Day 2024 : आरामदायी नोकरी सोडून बनली ‘जीवरक्षक’; वाचवते अनेकांचे प्राण

गोमन्तक डिजिटल टीम

सचिन कोरडे

Women Day 2024 :

खाद्याचा जीव वाचवणे यापेक्षा मोठे पुण्य असूच शकत नाही. अर्थातच, त्यासाठी तुमचा जीवही धोक्यात घालावा लागतो.

हिमाचलच्या अनन्या बाथ या युवतीने ‘एसी’तील आरामदायी मॅनेजरची नोकरी सोडून जीवरक्षक होण्याचा पर्याय निवडला. मला ‘जीव’रक्षक असल्याचा खूप अभिमान वाटतो, असे ती अभिमानाने सांगते.

बाणावली समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेली अनन्या गेल्या सहा वर्षांपासून ‘दृष्टी मरीन’सोबत काम करत आहे. कंपनीच्या वेगळ्या विभागात काम केल्यानंतर मला जीवरक्षक बनण्याची संधी मिळाली. या संधीमुळेच मी लोकांचे जीव वाचवू शकले व कसे वाचवावेत हे इतरांना शिकवू शकले. माझे आई-वडील माझे सर्वात मोठे समर्थक असून त्यांचा नेहमीच पाठिंबा असतो, असेही ती सांगते.

अन्यना म्हणाली की, जेव्हा मी काम करायला सुरूवात केली तेव्हा किनाऱ्यावर ‘महिला’ म्हणून मी एकटीच असायची. सुरूवातीला मला हे थोडे विचित्र वाटले, नंतर मात्र वातावरण स्वागतार्ह बनले. तुम्ही केवळ ‘जीवरक्षक’ आहात, असे दृष्टीकडून सांगितले जाते. येथे महिला व पुरुष हा भेदभाव नसतो. त्यामुळे मला हे काम करताना आनंद वाटतो.

गोव्यात येण्यापूर्वी अनन्या ही हिमाचल प्रदेशमधील एका कॅफेत मॅनेजर होती. ती राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू तसेच जिम्नॅस्टिक खेळाडूही आहे. २०१७ मध्ये ती दृष्टी मरीनमध्ये रुजू झाली. तिने विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समधून ‘पूल लाईफसेव्हर्स’ साठी प्रशिक्षणही दिले आहे. तसेच बीएची (मनोवैज्ञानिक आणि इंग्रजी) पदवी मिळविली आहे.

२८ वर्षीय अनन्या सध्या पुरुषांबरोबरच इतर महिलांना जीवरक्षणाचे धडे देत आहे. हे काम नोकरी म्हणून तर कर्तव्य म्हणून कसे पार पाडायचे याबाबतही तिचे मार्गदर्शन असते.

गर्भवती महिला कोसळली अन्‌...

जीवरक्षक म्हणून काही घटना माझ्या काळजात दाटल्या आहेत. अशीच एक घटना गर्भवती महिलेबाबतची आहे. ही महिला गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात होती आणि ती अचानक रस्त्यावर कोसळली.

आजूबाजूला सगळे बघत होते, मात्र मदतीला कुणी येत नव्हते. घटनेची माहिती मिळताच मी आणि माझे सहकारी प्रशिक्षक धावत गेलो आणि तिला वाचवू शकलो. अशा स्थितीत काय करायला हवे, हे माहीत असल्यानेच आम्ही तिला वाचवू शकलो, असे अनन्‍या हिने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT