

सासष्टी: कधी कोणीही विचार केला नसेल अशी घटना रंगपंचमीच्या दिवशी फातोर्ड्यात घडली, होळीच्या निमित्ताने २०१२ पासून फातोर्डा मतदारसंघात एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्ड्याचे विद्यमान आमदार विजय सरदेसाई व त्यांच्याकडून फातोर्डा मतदारसंघातून तीन वेळा पराभूत झालेले व विद्यमान भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक एकत्र आले.
दोघांची गळाभेट पाहून उपस्थितांत आनंदाचे व जोशाचे वातावरण निर्माण झाले. दोघांनी एकमेकांना रंग लावले तर एकत्रितपणे दामोदर लिंगावर जाऊन श्री दामोदराला गुलाल अर्पण केला. दोघांनीही फातोर्डा व मडगावकरांना तसेच गोमंतकीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. दामू नाईक म्हणाले की, फातोर्ड्यात श्री दामोदर लिंगावर होळी साजरी करण्याची प्रथा १९९२ पासून आजही कायम आहे.
आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, या होळीच्या निमित्ताने गोव्यातील सर्व समाज एकत्र यावा त्याचप्रमाणे होळी साजरी करण्यातून गोव्याची अस्मिता, अभिमान दिसायला हवा. गोव्यासाठी सकारात्मक बदल गरजेचा आहे व तो यंदा व्हावा, अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मडगाव पालिकेचे विद्यमान सत्ताधारी कौन्सिल हे सर्वाधिक भ्रष्ट आहे, अशी टीका फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज केली. सत्ताधारी गटाचे नगरसेवक त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांना नोकऱ्या देण्यात गुंतलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
सध्या जैविक विघटनशील (बायो डिग्रेडेबल) कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडे जागा उपलब्ध नाही.पालिकेने अशा प्रकारचा कचरा उचलणेच बंद केले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात कचऱ्याच्या राशी तयार झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.