Womens ODI Cricket: 7 बाद 137 वरून फटकावल्या 282 धावा! हैदराबादची झुंझार फलंदाजी; गोव्याच्या पोरींचा पराभव

Goa VS Hyderabad: महिलांच्या २३ वर्षांखालील एकदिवसीय करंडक क्रिकेट सामन्यात हैदराबादची ७ बाद १३७ अशी नाजूक स्थिती असताना गोव्याचे पारडे जड ठरले होते.
Goa VS Hyderabad
Goa VS HyderabadDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी ः महिलांच्या २३ वर्षांखालील एकदिवसीय करंडक क्रिकेट सामन्यात हैदराबादची ७ बाद १३७ अशी नाजूक स्थिती असताना गोव्याचे पारडे जड ठरले होते; पण नंतर ममता हिच्या नाबाद शतकामुळे चित्र बदलले आणि तिच्या संघाने एलिट ई गटात ६८ धावांनी विजयी सलामी दिली.

उत्तराखंडमधील देहरादून येथे मंगळवारी झालेल्या लढतीत हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २८२ धावा केल्या. ममता हिने ७६ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने नाबाद १०६ धावा केल्या. तिला के. श्रीवल्ली हिची शानदार साथ मिळाली.

तिने ४४ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह ५२ धावा केल्या. ममता व श्रीवल्ली यांनी आठव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केल्यामुळे हैदराबादची धावसंख्या भक्कम बनली. उत्तरादाखल गोव्याचा डाव ४४.५ षटकांत २१४ धावांत आटोपला. गोव्याची सलामी बॅटर ऊर्वशी गोवेकर हिने अर्धशतक नोंदविताना ९९ चेंडूंत ६ चौकारांसह ५४ धावा केल्या.

Goa VS Hyderabad
Ind Vs Eng: 'भारतीय प्रेक्षकांना शांत करू'! सॅम करनने ओकली आग; वानखेडे मैदान माहिती असल्याने जिंकण्याची अपेक्षा केली व्यक्त

तिने दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार तनया नाईक (३०) हिच्यासमवेत ६२ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याचा संघ २२व्या षटकांत १ बाद १०१ असा चांगल्या स्थितीत होता. तनया बाद झाल्यानंतर गोव्याचे खेळाडू ठरावीक अंतराने बाद होत गेले. गोव्याने अखेरच्या पाच विकेट अवघ्या नऊ धावांत गमावल्या.

Goa VS Hyderabad
IND vs ENG: वानखेडेवर रंगणार भारत-इंग्लंड सेमीफायनलचा थरार; बदला घेण्यासाठी इंग्लिश संघ सज्ज, पाहा संभाव्य 'प्लेइंग 11'

संक्षिप्त धावफलक 

हैदराबाद  : ५० षटकांत ९ बाद २८२ (वंका पूजा ३२, ममता नाबाद १०६, व्ही. प्रतीक्षा २९, के. श्रीवल्ली ५२, मेताली गवंडर १०-२-४६-०, हर्षिता यादव ९-०-४४-२, पूजा कलेल ९-०-५३-२, तनया नाईक ८-०-४८-२, निर्मिती ६-०-३९-१, सावली कोळंबकर ३-०-२१-१, सिद्धी सवासे ५-०-३१-०) वि. वि. गोवा  ः ४४.५ षटकांत सर्वबाद २१४ (हर्षिता यादव २५, ऊर्वशी गोवेकर ५४, तनया नाईक ३०, तनिशा गायकवाड १९, प्रेषा नाईक २७, स्वराली कासार २६, मेताली गवंडर ७, पूजा कलेल ६, सिद्धी सवासे नाबाद १, सावली कोळंबकर ०, निर्मिती ०, केसरी दृती ८-२-३८-४, वंका पूजा ९.५-०-५०-३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com