Suryakumar Yadav captaincy approach
Suryakumar Yadav captaincy approachDainik Gomantak

Suryakumar Yadav: खराब फॉर्ममधल्या खेळाडूंशी कसा वागतो कॅप्टन 'सूर्या'? संजूच्या तुफानी खेळीनंतर मोठा गौप्यस्फोट

Suryakumar Yadav on out of form player: खराब फॉर्मशी झगडणाऱ्या खेळाडूबरोबर जास्त काळजीने चांगला वागतो, अशी सूर्यकुमारने सविस्तर उत्तर देताना प्रक्रिया समजावून सांगितली.
Published on

मुंबई: टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली नसल्याचे शल्य माजी खेळाडूंच्या मनात आहे. पण तरीही भारतीय संघाने परत एकदा उपांत्य फेरी गाठली आहे हे विसरून चालणार नाही, हेसुद्धा बोलले जात आहे. थोडक्यात सांगायचे तर शेवटच्या टप्प्यात भारतीय संघाकडून सगळ्यांच्या जास्त चांगल्या परिपूर्ण खेळाच्या अपेक्षा आहेत.

यासंदर्भात बोलताना माजी खेळाडू दिनेश कार्तिक म्हणाला, की संजू सॅमसनच्या खेळीने मला खूप आनंद झाला. संजू शांत सुस्वभावी खेळाडू आहे. त्याला लय का सापडत नव्हती हे कळत नव्हते. वेस्ट इंडीजसमोर त्याने सामना जिंकून देणारी खेळी केली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हातातील काम फत्ते करूनच तो परतला. फलंदाजी करताना त्याने पूर्णवेळ तंत्रशुद्ध खेळ केला. उगाच अनावश्यक मोठा फटका मारला नाही.

स्वत: संजू सॅमसन याने सामन्यानंतर विचार मांडताना मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिल्याने अखेर यश मिळाले असे सांगितले. विश्वचषक स्पर्धेअगोदर न्यूझीलंडसमोर खेळताना मला फलंदाज म्हणून सातत्याने अपयश आले. मग मी काही दिवस क्रिकेटपासून लांब गेलो. नकारात्मक विचार मनात डोकावू लागले असताना खेचून स्वत:ला सकारात्मक विचारांकडे घेऊन गेलो. चांगला खेळ होताना काय गोष्टी मी करीत होतो याचा अभ्यास केला. मन शांत केले.

Suryakumar Yadav captaincy approach
Ind Vs Eng: 'भारतीय प्रेक्षकांना शांत करू'! सॅम करनने ओकली आग; वानखेडे मैदान माहिती असल्याने जिंकण्याची अपेक्षा केली व्यक्त

सूर्यकुमार यादव कप्तान म्हणून खराब कामगिरी होत असलेल्या खेळाडूशी कसा वागतो, असे विचारता सूर्या म्हणाला, की जो खेळाडू प्रयत्न करूनही अपयशी ठरत असतो त्याच्याबरोबर बसावे लागते. गप्पा माराव्या लागतात. विनोद करून हसावे आणि त्याला हसवावे लागते. कधी खराब फॉर्मशी झगडणाऱ्या खेळाडूला कारमध्ये बसवून लाँग ड्राइव्हला जावे लागते, तर कधी दोघांनी चालत चक्कर मारायची असते. मग तो खेळाडू मनातून थोडा शांत झाला की बसून एकत्र चांगले उपाय शोधून काम चालू करावे लागते. हे सगळे हसत हसत केले की बॅड पॅच जाऊन आम्ही एकत्र चांगले रंगीत चित्र संघासाठी चितारू शकतो.

Suryakumar Yadav captaincy approach
IND vs ENG: वानखेडेवर रंगणार भारत-इंग्लंड सेमीफायनलचा थरार; बदला घेण्यासाठी इंग्लिश संघ सज्ज, पाहा संभाव्य 'प्लेइंग 11'

खेळाडू असो वा प्रशिक्षक भारतीय संघातील प्रत्येक माणूस चांगल्या लयीत खेळणाऱ्या खेळाडूपेक्षा खराब फॉर्मशी झगडणाऱ्या खेळाडूबरोबर जास्त काळजीने चांगला वागतो, अशी सूर्यकुमारने सविस्तर उत्तर देताना प्रक्रिया समजावून सांगितली. सूर्यकुमार यादव हे समजावून सांगताना खराब फॉर्मशी झगडणाऱ्या संजू सॅमसनला त्याच्या राज्यात म्हणजे केरळला सामना खेळायला गेल्यावर लोकल हीरो आल्याचे सांगत वाट करून द्यायला पुढाकार घेत होता, हे दृश्‍य डोळ्यासमोर आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com