Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Goa Crime News: पतीसह ट्रकवाल्‍याकडून ३ लाखांची खंडणी उकळण्‍याचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

कोलवा पोलिस स्‍थानकाचे निरीक्षक विभिनव शिरोडकर यांनी आपल्‍याला अमानुष मारहाण केल्‍याचा आरोप केलेल्‍या एल्‍मिरा दोरादो हिच्‍याविरोधात तिचा पती साईराज नाईक व अन्‍य एकावर ट्रकचालकाकडून तीन लाखांची खंडणी उकळण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचा गुन्‍हा वेर्णा पोलिसांत नोंद करण्‍यात आला आहे. या प्रकरणात पती-पत्‍नीला अटकही करण्‍यात आली होती.

महिराम बिष्‍णोई (४४, बिकानेर-राजस्‍थान) याने या प्रकरणी वेर्णा पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार बेताळभाटी येथील ड्रीम लायफ प्रा. लि. या कंपनीसाठी हा ट्रक राजस्‍थानातून माल घेऊन आला होता.

२० जून रोजी रात्री साडेबाराच्‍या सुमारास उतोर्डा जंक्‍शनवर तो पोहोचला असता, त्‍याने तेथून बाईकवरून जाणाऱ्या पती-पत्‍नीला कंपनीचा पत्ता विचारला. त्‍यांनी ‘आपल्‍या पाठोपाठ तुम्‍ही या, तुम्‍हाला वाट दाखवतो’ असे सांगून त्‍याला एका निर्जनस्‍थळी नेले.

तिथे ट्रकचालकाला खाली उतरवून त्‍याच्‍याकडे ३.१८ लाख रुपयांची मागणी केली. त्‍यानंतर स्‍कूटरवर असलेला एक लांबलचक सुरा काढून पैसे न दिल्‍यास तुला ठार मारू, अशी धमकी दिली. तसेच ट्रकची चावी घेऊन दोघे निघून गेले.

त्‍यानंतर आपण १०० क्रमाकांवरून पोलिसांशी संपर्क साधला. सुमारे १५ मिनिटांनी पोलिस पोहोचले. त्‍यांनी संशयितांना बोलावून घ्‍यायला सांगितले. त्‍यानुसार आपण संशयितांनी दिलेल्‍या फोनवर संपर्क साधून ‘पैशाची व्‍यवस्‍था केली आहे, तुम्‍ही या’ असे सांगितले.

त्‍यानंतर १५ मिनिटांनी संशयित पती-पत्‍नी आपल्‍या स्‍कूटरवरुन आले. त्‍यांच्‍याबरोबर आणखी एक दुचाकीस्‍वार आला. मात्र त्‍यांनी पोलिसांना पाहिल्‍यावर तेथून पळून जाण्‍याचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी त्‍यांना पकडण्‍याचा प्रयत्‍न केला असता ते स्‍कूटरवरून खाली पडले आणि जखमी झाले, असे या तक्रारीत म्‍हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संशयिताविरोधात भारतीय दंड संहितेच्‍या ३४१ (बेकायदा अटकाव करणे), ५०६-२ (जिवंत मारण्‍याची धमकी देणे), ३९२ (जबरी चोरी) यासह ३४ (संगनमताने गुन्‍हा करणे) या कलमांखाली गुन्‍हा नोंद केला आहे. या प्रकरणी संशयित पती-पत्‍नीला अटकही करण्‍यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT