Voting DainiK Gomantak
गोवा

Lok Sabha Election 2024: मतदान करतानाचा फोटो काढताना फातोर्डा येथे महिलेला पकडले; चौकशीअंती सुटका

Lok Sabha Election 2024: फातोर्डा येथील एका मतदानकेंद्रावर एक महिलेला मतदान करतानाचा फोटो मोबाईलवर काढत असताना आढळली.

गोमन्तक डिजिटल टीम

Lok Sabha Election 2024: फातोर्डा येथील एका मतदानकेंद्रावर एक महिलेला मतदान करतानाचा फोटो मोबाईलवर काढत असताना आढळली. लगेच तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी चौकशी करून तिची सुटका केली.

यासंदर्भात बोलताना फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, धमकी देऊन मतदान करून घेण्याची ही भाजपची पद्धतच आहे. ज्या महिलेला पकडले तिचे नाव हजरत बी असे असून आठ वर्षांपूर्वी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी मिळाली होती. तेथून बदलीसाठी तिचा प्रयत्न सुरू होता.

एका भाजप नेत्याने तिला बदली करण्याचे आश्‍‍वासनही दिले होते. पण त्या बदल्यात तिने भाजपला मत दिल्‍याचा फोटो आणून द्यायला सांगितले होते. मात्र काही नेत्यांनी पोलिसांवर (Police) दडपण आणून तिची सुटका करून घेतली. हे कृत्य तिला कुणी करायला लावले, याची चौकशी करणे गरजेचे आहे, अन्‍यथा निवडणूक आयोगाच्या मुख्य निर्वाचन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाईल, असा इशाराही सरदेसाई यांनी दिला.

सदर घटना सासष्टीतील आठही मतदारसंघांत आज लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र या निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाची संघटनात्मक उणीव दिसून आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यासह मोतीडोंगर येथील मतदानकेंद्राला भेट दिली.

त्यानंतर लगेच फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई तेथे पोहोचले. तालुक्यात सकाळच्या सत्रात मतदारांचा ओघ कमी दिसला. दुपारपर्यंत फक्त ३५ टक्केच मतदान झाले होते. मात्र तीन वाजल्यानंतर मतदानकेंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. मडगाव, नावेली व फातोर्ड्यात भाजपचे कार्यकर्ते मतदारांना प्रोत्‍साहित करत होते.

विजय सरदेसाई, आमदार (फातोर्डा)

धमकी देऊन मतदान करून घेण्याची ही भाजपची पद्धतच आहे. ज्या महिलेला पकडले तिचे नाव हजरत बी असे असून आठ वर्षांपूर्वी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी मिळाली होती. तेथून बदलीसाठी तिचा प्रयत्न सुरू होता. एका भाजप नेत्याने तिला बदलीचे आश्‍‍वासनही दिले होते. पण त्या बदल्यात तिने भाजपला मत दिल्‍याचा फोटो आणून द्यायला सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुख-वैभवाचा 'राजयोग'! शुक्राच्या पॉवरफुल्ल गोचरमुळे 'या' 3 राशींना तगड फायदा, आता फक्त पैसा अन् पैसाच; गोल्डन पिरीयड सुरु

VIDEO: 10 रुपयांच्या अंड्याला लागली 'इतक्या' हजारांची बोली! इराणमधील युद्धग्रस्तांसाठी लडाखी जनतेचा मदतीचा हात; व्हिडिओ व्हायरल

Horoscope April 2026: 14 एप्रिलनंतर पालटणार 'या' राशीचं नशीब! गुरु आणि सूर्याच्या साथीमुळे कष्टाला मिळणार फळ; उत्पन्नाची दारे होणार खुली

US Israel Iran War: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू; युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान संघर्षाचा भडका

US Iran War: इराणच्या वाळवंटात स्वतःचीच हाय-टेक विमाने बॉम्बने उडवली, अमेरिकेनं असं का केलं? 'त्या' रात्रीचा थरार व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT