Lok Sabha Election 2024: बार्देशात ‘सायलंट वोटिंग’चा करिष्मा! कळंगुटमध्ये अल्पसंख्याकांचे मतदान वाढले

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी (ता.७) गोव्यात मतदान पार पडले. बार्देशात शांततेत मतदान झाले.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Dainik Gomantak

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी (ता.७) गोव्यात मतदान पार पडले. बार्देशात शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नेतेमंडळी सकाळच्या सत्रातच मतदानासाठी बुथवर पोहोचली. यावेळी बार्देशात ‘सायलंट वोटिंग’चा करिष्मा विजयी उमेदवाराच्या मताधिक्यात महत्त्वाचा वाटा उचलेल, याचे संकेत आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान शिवोलीमध्ये (७५.६६) झाले. हा तालुका नेहमीच भाजपच्या बाजूने उभा राहिल्याचे मागील काही निकालांतून स्पष्ट होते. यावेळी बार्देशकर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहून मतदान करताना दिसले, तर अल्पसंख्याक उमेदवारांची भूमिका किंचित वेगळी दिसली.

दरम्यान, कळंगुट, हळदोणा, शिवोली व थिवी या मतदारसंघांतील अल्पसंख्याक मतदारांमध्ये राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत नाराजीचा सूर जाणवला. विशेष म्हणजे, कळंगुटमधील ख्रिस्ती मतदार पहिल्यांदाच लोकसभेला मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे बार्देश तालुक्यातील ही टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडते हे ४ जूनला स्पष्ट होईल. तसेच, ‘आरजी’च्या मतांवर उत्तरेतील विजयी उमेदवाराचे एकूणच मताधिक्य अवलंबून राहील, असे निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदविले आहे.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

या निवडणुकीत भाजपने (BJP) अयोध्येतील श्रीराम मंदिर, ३७० कलम रद्द करणे तसेच विकसित भारताच्या मुद्यावर निवडणूक लढविली, तर उत्तरेतील २०पैकी १८ आमदार हे सत्ताधारी भाजपचे आहेत, तर बार्देशातील सात मतदारसंघांपैकी ६ आमदार हे भाजपचे असल्याने केवळ हळदोणाचे लोकप्रतिनिधित्व करणारे अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांच्या खांद्यावर या तालुक्याची संपूर्ण जबाबदारी होती. दुसरीकडे काँग्रेसने लोकसभा निवडणूक गोव्यातील ज्वलंत विषय जसे की महागाई, म्हादई, एसटी आरक्षण, अँटी इन्कबन्सी या मुद्यांवर लढविली. ‘आरजी’ला गत विधानसभा निवडणुकीवेळी १० टक्के वोट शेअर मिळाले होते आणि वीरेश बोरकर यांच्या रूपात त्यांचा एक उमेदवार जिंकून आला होता.

यावेळी विकसित भारत, मोदींचा चेहरा, अँटी इन्कबन्सी, तसेच धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मत देण्यासाठी आर्चबिशपचे परित्रक, बेरोजगारी, विधानसभा निवडणुकीसाठी एसटीसाठी आरक्षण, कोळसा हाताळणी तसेच दक्षिण पश्चिम रेल्वे आणि विकास, दुपदरीकरण यासारखे घटक यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे प्रमुख घटक राहिले होते.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

रोहन खंवटे, आमदार

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेल्या माझ्या सर्व गोमंतकीयांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. मोदी सरकार पुन्हा आणण्यासाठी अथक प्रचार करणाऱ्या भाजपच्या प्रत्येक सदस्याचे मी मनापासून आभार मानतो.

अ‍ॅड. रमाकांत खलप, काँग्रेसचे उत्तर गोवा उमेदवार

मतदार लोकशाही (Democracy) उत्सवात भाग घेण्यास उत्साही दिसले. मतदारांचा मला मोठा पाठिंबा असून मी ४० ते ५० हजारांच्या मताधिक्याने जिंकणार यात शंका नाही.

प्रतीक्षा हरिजन, नवमतदार

पहिल्यांदाच मतदान करत असल्याने मी उत्साही आहे. लोकशाही उत्सवात भाग घेण्याची संधी मिळाल्याने वेगळीच ऊर्जा व सकारात्मकता असून मतदार या नात्याने माझे कर्तव्य मी पार पाडले.

भाजपकडून सर्व ताकद पणाला

  • भाजपचे सूक्ष्म संघटन व व्यवस्थापन हे काँग्रेस व ‘आरजी’च्या तुलनेत मजबूत आहे. मतदान केंद्रावर भाजपच्या गोटात उत्साह व आनंद दिसला. काँग्रेसच्या टेबलवर गर्दीची उणीव.

  • भाजपने आमदार, सत्ताधारी पंचसदस्यांची संपूर्ण ताकद निवडणुकीत झोकून दिली.

  • ‘आरजी’चे अनेक मतदान केंद्रावर पोलिंग एजेंटही दिसले नाहीत.

  • मतदान केंद्रांवर मतदारांसाठी उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून शीतपेयांची व्यवस्था केली होती. मात्र, अधिकतर बुथवर सकाळी ११ वा.नंतर शीतपेये पोहोचली. तीही थंड नव्हती. तसेच बुथवर कुलरची सोय केली होती.

  • पिंक बुथवर मतदारांना निवडणूक आयोगाकडून कापडी पिशव्यांचे वितरण केले तसेच वैद्यकीय सुविधांची सोय होती.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक
  • काल सकाळी ११ वा.पर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारच्या वेळी वेग मंदावला तर दुपारी ३ वा.नंतर मतदार घराबाहेर पडले.

  • म्हापशातील मरड येथील सरकारी कॉम्प्लेक्समधील एका बुथवर दुपारी १२ वा.च्या दरम्यान तांत्रिक समस्या उद्भवली. परिणामी, दहा मिनिटे मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला. तसेच पेडेमधील एका बुथवर सुरवातीलाच बॅटरीमुळे विलंब झाला.

  • म्हापशातही ग्रीन बुथ उभारले गेले; परंतु तिथे मतदारांना रोपटी दिली जात नव्हती.

  • काही ठरावीक तालुक्यांतील बुथ सोडल्यास मतदारांच्या रांगा नव्हत्या.

  • अपंग व्यक्तींसाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअर तसेच खास रिक्षाची व्यवस्था केली होती. काही मतदान केंद्रांवर स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन लावले होते.

हडफडेत शीतपेये देण्यास उशीर

हडफडे पंचायत क्षेत्रातील एका मतदान केंद्रावर मतदारांना मतदान करून झाल्यावर शीतपेयांच्या बाटल्या देण्यास दिरंगाई करण्यात येत असल्याची तक्रार माजी पंचसदस्यांनी केली. त्यामुळे काही काळ थोडासा तणाव दिसला; परंतु उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालून ही समस्या दूर केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com