सुवर्णा श्याम साटेलकर  gomantak digital team
गोवा

आत्मनिर्भरतेसाठी ‘ती’ चालवते टॅक्सी!

महिलांसाठी आदर्श : सुवर्णा यांचे धाडसी पाऊल; शालेय मुलांची बनलीय लाडकी ‘काकी’

गोमंतक ऑनलाईन टीम

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे येत आहेत. आत्मनिर्भर बनण्यासाठी महिलांची धडपड सुरू असते आणि काही महिला वेगवेगळ्या माध्यमातून आत्मनिर्भर बनल्या आहेत. अशी अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. डिचोलीतील सुवर्णा श्याम साटेलकर या महिलेने एक वेगळेच क्षेत्र निवडले आहे. संसाराचा प्रपंच सांभाळताना सुवर्णा चक्क ‘टॅक्सी’ व्यवसायात उतरल्‍या. स्वतः ड्रायव्हर (चालक) बनून सुवर्णा यांनी गेल्या वर्षीपासून आपल्या मुलांसह अन्य विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी स्वीकारली असून, ती त्‍या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. या मुलांची त्‍या लाडकी ‘काकी’ बनल्‍या आहेत.

सुवर्णा साटेलकर या राहत असलेल्या वाठादेव आणि जवळपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना रोज शाळेत नेऊन सोडणे आणि पुन्हा घरी आणण्‍याची जबाबदारी पार पाडत आहेत. प्रत्येक मुलामागे तिला ठरलेला मोबदलाही मिळतो. स्वतःच्या मुलांप्रमाणे लहान मुलांना शाळेत आणि घरापर्यंत सोडताना त्‍या त्‍यांची आपुलकीने काळजी घेतात. त्‍यामुळे त्‍या मुलांनाही आपल्याशा वाटतात आणि म्हणूनच मुलेही त्‍यांना प्रेमाने ‘काकी’ संबोधतात.

प्रत्येक स्त्रीच्या यशात तिच्या जोडीदार नवऱ्याची भूमिकाही तेवढीच महत्वाची असते. ड्राईव्हर (चालक) बनून मुलांची शाळेत ने-आण करण्याचा विचार सुवर्णा यांनी आपल्या पतीजवळ बोलून दाखवला. त्यावेळी ‘येस, यू गो अहेड’ अशा शब्दांत पतीने होकार दिला.

नवऱ्याकडून मिळालेला पाठिंबा आणि सकारात्मक प्रतिसाद त्यातच रजनी तलवार, श्याम नाईक, वंदना फोगेरी, स्मिता केसरकर, मेघना सावळ आदी मित्र-मैत्रिणींकडून मिळालेले प्रोत्साहन. त्यामुळेच मी या क्षेत्राकडे वळले , असे सुवर्णा यांनी सांगितले.अन्‌ कल्पना उतरली सत्यात पती एका नामांकित खासगी कंपनीत नोकरीला, परंतु ती कंपनी बंद झाली.

मग घरात हळूहळू आर्थिक समस्या निर्माण होऊ लागल्‍या. सुवर्णा आपल्या मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला जात होत्या. अन्य मुलांची शाळेत ने-आण करायचा विचार त्‍यांच्‍या मनात आला व त्‍यांनी काही पालकांशी संपर्क साधला. त्‍यानंतर त्‍यांची कल्पना सत्यात उतरली. वाठादेव आणि परिसरातील पालकांकडून त्‍यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

भावाने शिकवली चारचाकी

सांतइस्तेव्ह हे सुवर्णा यांचे माहेर. त्‍यांना वाहन चालविण्याची आवड. ही आवड लक्षात घेऊन भावाने त्‍यांना चारचाकी चालविण्यास शिकवले. त्यावेळी सुवर्णा इयत्ता अकरावीत शिकत होत्‍या. पुढे वाहन चालवण्यात पारंगत झाल्यानंतर सुवर्णा यांनी वाहतूक खात्याकडून वाहन चालविण्याचा परवाना मिळवला. त्याचा आपल्याला आता फायदा झाला, असे सुवर्णा साटेलकर सांगतात. तबला आणि पखवाजवादनाचीही सुवर्णा यांना आवड. गोमंतकातील नावाजलेले तबलापटू तुळशीदास न्हावेलकर यांच्याकडून त्‍यांनी तबलावादनाचे धडे गिरवले आहेत.

३० मुलांची जबाबदारी

शहरातील विविध शाळांमध्‍ये केजी ते दहावीपर्यंत शिकणारी जवळपास ३० मुले नियमितपणे सुवर्णा चालवत असलेल्या मोटारगाडीत बसून शाळेत ये-जा करतात. केजी आणि हायस्कूलची वेळ यांच्यात फरक आणि एकाच वेळी गाडीत सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था होत नसल्याने शाळेत सोडताना आणि दुपारी घरी पोचवताना तीन फेऱ्या माराव्या लागतात, असे सुवर्णा यांनी सांगितले. याव्यतिरिक्त सायंकाळी काही मुलांना त्‍या ट्युशनलाही (शिकवणी) घेऊन जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT