Illegal Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

सावर्डे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. म्हादई नदीत बेकायदेशीर रेती उत्खनन करत असताना एका महिलेचा म्हादई नदीत बुडून मृत्यू झाला.

Manish Jadhav

वाळपई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर रेती उत्खननाच्या घटना सातत्याने समोर येतायेत. यातच आता, सत्तरी येथे म्हादई नदीत बेकायदेशीर रेती उत्खननादरम्यान महिलेच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. सुवर्णा दामोदर गावकर असे या महिलेचे नाव आहे. रेती उत्खनन करत असताना रविवारी (17 नोव्हेंबर) दुपारी तीनच्या सुमारास पीडिता बुडाली तर तिघेजण थोडक्यात बजावले.

झालं अस की?

सावर्डे तार सत्तरी येथील म्हादई नदीच्या पात्रात नेहमीप्रमाणे रेती उत्खननाचे काम सुरु होते. त्यात एका काठावरुन दुसऱ्या काठावर रेती नेण्यासाठी होडीच्या सहाय्याने तीन महिला व एक पुरुष त्या होडीत येत असताना नदी पात्रात होडीचा तोल जावून सर्वजण पाण्यात कोसळले. यामध्ये तीघांना वाचविण्यात यश आले मात्र सुवर्णा यांचा बुडून मृत्यू झाला. पती दामोदर गावकर यांनी सुवर्णा यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु ते निष्पळ ठरले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र म्हादईचे पात्र मोठे असल्याने त्यांना पाण्यात उतरता येत नव्हते. त्यांनी तातडीने दुसरी बोट आणली. संध्याकाळी उशीरापर्यंत जवानांनी सुवर्णा यांच्या मृतदेहाचा शोध घेतला. या शोध मोहीमेत ग्रामस्थांनीही जवानांना मदत केली.

अग्निशमन दलाचे फायर फायटर अरविंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला. संध्याकाळी उशीरापर्यंत महिलेचा शोध घेण्यात आल्यानतंर काळोख झाल्यामुळे शोध मोहिम थांबविण्यात आली. आता सोमवारी सकाळी परत शोध मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आसल्याची माहिती देसाई यांच्याकडून देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT