White Water Rafting Dainik Gomantak
गोवा

White Water Rafting: म्हादईत ‘व्हाईट वॉटर राफ्टिंग’ला सुरुवात; पर्यटकांची पावले वळू लागली सत्तरीकडे!

White Water Rafting: पर्यटन विकास महामंडळ व ब्रिटिश ॲडव्हेंचर स्पोर्टसच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या व्हाइट वॉटर राफ्टिंगला 1 जुलैपासून सुरुवात करण्यात आली.

Manish Jadhav

पर्यटन विकास महामंडळ व ब्रिटिश ॲडव्हेंचर स्पोर्टसच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या व्हाइट वॉटर राफ्टिंगला 1 जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे. यंदा पावसाने दमदार हजारी लावल्याने हा मौसम वॉटर राफ्टिंगसाठी उत्साहजनक ठरणार आहे. सध्या पावसाचा जोर सुरु असल्याने राफ्टिंगसाठी अनेक पर्यटकांची पावले सत्तरीकडे वळू लागली आहेत.

दरम्यान, सत्तरीतील (Sattari) नगरगाव पंचायत क्षेत्रातील उस्ते, धावे येथील म्हादई नदी प्रवाहावर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी व्हाइट वॉटर राफ्टिंग प्रकल्पाला चालना दिली. त्यामुळे साहसी पर्यटकांची पावले सत्तरीकडे वळू लागली.

सध्या या साहसी क्रीडा प्रकाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. धावे, उस्ते येथून या साहसी क्रीडा प्रवासाला सुरुवात करण्यात येते व 10 किलो मीटरचे अंतर दीड तासांमध्ये कापल्यानंतर सावर्डे तार येथे समाप्ती होते. सकाळी 9 व दुपारी 2 या वेळेत हा वॉटर राफ्टिंगच्या प्रवास सुरु असतो.

मोठ्या प्रमाणात साहसी पर्यटक यात भाग घेतात. यात देशी तसेच परदेशी पर्यटकांचाही समावेश असतो. पर्यटन विकास महामंडळाने ब्रिटिश संस्थेच्या माध्यमातून या क्रीडा प्रकाराला सुरुवात केली आहे.

गावाला फायदा: सरपंच

म्हादई नदीमुळे सत्तरीला मोठे वैभव प्राप्त झाले आहे. चारी बाजूने निसर्गाची सुंदरता टिकून ठेवण्यासाठी येथे आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच पर्यटक स्थळाची निगा तसेच स्वच्छता राखणे आवश्‍यक आहे. व्हाईट वॉटर राफ्टिंगमुळे आज नगरगाव पंचायतीचे नाव जगाच्या पटलावर गेले आहे. याचा पंचायतीलाही फायदा होत असून गावात रोजगाराच्या (Employment) संधीही वाढत आहेत, असे नगरगावच्या सरपंच संध्या खाडिलकर यांनी सांगितले.

उस्ते गाव जगाच्या नकाशावर...

व्हाईट वॉटर राफ्टिंगमुळे सत्तरीतील उस्ते गाव आज जगाच्या नकाशावर चमकू लागले आहे. तसेच वाढत्या पर्यटकांमुळे नगरगाव पंचायत क्षेत्राबरोबरच सत्तरीतील अन्य भागालाही याचा पर्यटन लाभ होऊ लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT