River Rafting Goa: गोव्यात वॉटर राफ्टिंग सुरु, पर्यटकांना अनुभवता येणार थरार; सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार उपक्रम

River Rafting: पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठा आणि गतिमान झालेला असतो, जो राफ्टिंगसाठी अतिशय योग्य असतो.
River Rafting Goa: गोव्यात वॉटर राफ्टिंग थरार; सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार उपक्रम
River Rafting GoaDainik Gomantak

पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठा आणि गतिमान झालेला असतो, जो राफ्टिंगसाठी अतिशय योग्य असतो. त्यामुळे राफ्टिंगप्रेमी पावसाळ्याची वाट पाहत राहतात. राज्यात जून महिन्यात मुसळधार पाऊस एकदा सुरु झाला की ग्राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी तिथे पर्यटकांची आपोआपच रीघ लागते. गोव्यात पावसाळा सुरु झाला की पर्यटन, समुद्रकिनाऱ्यापासून गोव्याच्या अंतर्भागात वळते.

गोव्याच्या (Goa) पश्चिमेला असलेल्या डोंगरदऱ्या गर्द हिरवे रुप धारण करुन निमंत्रण देत असतातच. पश्चिम घाटाचा भाग असलेल्या डोंगरांची विविधता काय वर्णावी? गर्द रानात लपून असलेल्या तिथल्या कड्यांना या दिवसात झरे फुटतात, नद्या तुडुंब भरुन वाहत असतात, झाडे पाने पावसाच्या पाण्याने निथळून नखऱ्याने लकाकत असतात.

तिथल्या त्या सौंदर्याचा रस अनुभवण्यासाठी स्थानिक तसेच परराज्यातील पर्यटकांचा ओघ त्या दिशेला वळताना दिसतो.

पावसाळ्याच्या दिवसातील तिथले आणखीन एक आकर्षण म्हणजे वाळपई येथील नदीत सुरू होणारे व्हाईट वॉटर राफ्टिंग. पावसाळ्यात या नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठा आणि गतिमान झालेला असतो, जो राफ्टिंगसाठी अतिशय योग्य असतो. त्यामुळे राफ्टिंग प्रेमी पावसाळ्याची वाट पाहत राहतात. राज्यात जून महिन्यात मुसळधार पाऊस एकदा सुरु झाला की ग्राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी तिथे पर्यटकांची आपोआपच रीघ लागते.

River Rafting Goa: गोव्यात वॉटर राफ्टिंग थरार; सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार उपक्रम
River Rafting Goa : म्हादईच्या प्रवाहावर ‘व्हाईट वाॅटर राफ्टिंग’चा थरार; देशी-विदेशी पर्यटक सहभागी

गोव्यात मोसमी पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. वाळपईच्या नदीत पाण्याचा जोरही वाढलेला आहे आणि त्यामुळे गेल्या सोमवारपासून तिथे व्हाईट वॉटर राफ्टिंगला सुरुवातही झाली आहे. राफ्टिंगच्या पहिल्याच दिवशी पाच जणांनी व्हाईट वॉटर राफ्टिंगमध्ये भाग घेऊन थरार अनुभवला.

आता राज्यात पाऊस असेपर्यंत म्हणजे साधारण सप्टेंबरपर्यंत जीटीडीसीचे (गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) पाठबळ असलेला हा उपक्रम चालू राहील. जीटीडीसीच्या नियंत्रणाखाली हा उपक्रम खाजगी कंपनीमार्फत चालवला जातो.

River Rafting Goa: गोव्यात वॉटर राफ्टिंग थरार; सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार उपक्रम
Goa Waterfalls And Rivers: धबधब्यांवर जाल, तर लाखाचा दंड अन्‌ अटक; गोवा वन खात्याचा आदेश

राफ्टिंगच्या एका फेरीसाठी प्रति व्यक्ती 1800 रुपये आकारले जातात. सुरक्षेच्या कारणास्तव 120 किलोपेक्षा जास्त वजनाच्या व्यक्तीला राफ्टिंगमध्ये परवानगी नाही. राफ्टिंग दरम्यान दारु पिणे, मौल्यवान वस्तू बाळगणे इत्यादीला प्रतिबंध असतो.

राफ्टिंग ट्रिप दिवसातून दोनदा आयोजित केल्या जातात. साहसप्रेमी लोक दूरवरुन येऊन या उपक्रमाचा आनंद घेतात. आठवड्याच्या अखेरीस इथे खूप गर्दी असते आणि राफ्टींगमध्ये जागा मिळवण्यासाठी व्यक्तीला जीटीडीसीच्या वेबसाईटवरुन जागा आगाऊ आरक्षित कराव्या लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com