Himachal Pradesh Governor  Rajendra Arlekar
Himachal Pradesh Governor Rajendra Arlekar Dainik Gomantak
गोवा

हिमालयाची उंची अन् समुद्राच्या खोलीचा समन्वय राखून कार्य करणार: राज्यपाल आर्लेकर

दैनिक गोमन्तक

मोरजी: आपण राज्यात समुद्राच्या किनारी राहणारा अचानक जे आपल्या स्वप्नी होते कि एकदिवस आपल्याला हिमालयाचे दर्शन आणि सीमेवर जावून सैनिकांच्या हातावर राखी बांधण्याचे होते. ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे, आठ दिवसात आपण राखी हिमाचल प्रदेशच्या सीमेवर चायना बॉर्डर (China border) आहे, त्या ठिकाणी जावून राखी बांधणार आहे, समुद्राच्या तळाची खोली आणि उंच हिमालय या दोघांचे समन्वय राखून मला कार्य हे देशहिताचे करायचे आहे, असे गौरवोद्गार हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Himachal Pradesh Governor Rajendra Arlekar) यांनी नागझर पेडणे येथील शारदा उच्चमाध्यमिक विद्यालय आणि चैतन्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक राखी सैनिकासाठी या उपक्रम शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी उच्चमाध्यामिक विद्यालयाचे व्यवस्थापक, श्रीधर शेणवी देसाई, प्रताप भेंडाळकर, इंडियन आर्मीची मोहंती, कमांडर प्रियमवदा सिंग परी, नेव्हीचे चीफ ऑफिसर अनंत जोशी,प्रा. गजानन मराठे आदी उपस्थित होते. सुरुवातीला दीप प्रज्वलित आणि विविध हायस्कूल मधील राज्यभरातील १० दहा हजार राख्या राज्यपाल आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

निष्ठेने काम करा, देशप्रेम जागवा

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बोलताना कोणतेही काम निष्ठेने प्रेमाने आणि राष्ट्रीय भावनेने करा, आता पर्यंत आपण जे जे काम केले ते राष्ट्रीय भावनेने, भारतीय जनता पार्टीचे जे काम केले तेही त्याच भावनेतून आणि निष्ठा ठेवलेल्या कामाची दखल हि राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते, त्याच पद्धतीने आपण आता कोणत्याच राजकीय पक्षाचा सदस्य नाही. मात्र आता राज्यपाल असल्याने त्या पदाची शान राखत असतानाच देश प्रेम कुठेही मागे पडणार नसल्याचे सांगितले.

राखीचा धागा सैनिकाचे पाठबळ

आज आम्ही मनमोकळेपणाने जे कार्यक्रम करतो ते केवळ सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकामुळे, त्यांच्यासाठी प्रत्येकाच्या मनात आदर सन्मान असायला हवा. त्याना एकदा तरी आम्ही सलाम नमन करायला हवे. आम्ही त्याचे स्मरण करत असतानाच आमचा एक राखीचा धागा त्या सैनिकांच्या मनगटावर बांधला जाईल त्यावेळी त्या सैनिकाना १० हत्तीचे बळ मिळेल असे सांगून राखी हा एका धागा नसून ते राष्ट्रीय बंधन असल्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.

देशाची ताकत युवा पिडीत

देशाची ताकत या युवा पिढीत आहे, त्यामुळे देशप्रेम जागवणे आणि प्रेरणा घेवून काम करायला हवे, आम्हाला वंदेमातरम म्हणण्यासाठी न्यायालयाला सांगाव लागत कि राष्ट्रीय गीत जन गण मन चालू असताना उभे रहावी कि बसावे हा वाद चालू आहे हेच आमचे राष्ट्र प्रेम का असे सवाल आर्लेकर यांनी उपस्थित केला.

आमच्यात देशात ध्वजारोहण करण्यास मनाई ?

राष्ट्रीय हित महत्वाचे आहे, कुठ्ठळी वास्को येथील बेटावर ध्वजारोहण करण्यास एक राजकारणी स्थानिकाना फितूर होवून त्याना भडकावतो आणि मग ते विरोध करतात हेच काय ते त्यांचे राष्ट्रीय प्रेम असा प्रश्न आर्लेकर यांनी उपस्थित केला. यावेळी भारतीय सेनेचे हवालदार मोहंती व अनंत जोशी यांची भाषणे झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT