Police writes letter to Tourism Dept. Dainik Gomantak
गोवा

Goa Police: पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी 'त्या' दोन रिसॉर्टचा परवाना रद्द होणार? पोलिसांचे पर्यटन विभागाला पत्र

पर्यटन विभागानेही बजावली नोटीस

Akshay Nirmale

Goa Police: परदेशी पर्यटकांवर झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर पेडणे पोलिसांनी मांद्रेतील दंडोसवाडो येथील आणि मोरजीतील मार्डीवाडा येथील दोन रिसॉर्ट्सचे परवाने रद्द करण्यासाठी पर्यटन विभागाला पत्र लिहिले आहे.

यातील एका प्रकरणात, उत्तराखंडमधील हॉटेल कर्मचारी अभिषेक वर्मा याने एका डच महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. ती राहत असलेल्या रिसॉर्टमध्ये घुसून त्याने तिला क्रूरपणे मारहाण केली होती. तर दुसर्‍या घटनेत, हॉटेलमधील कर्मचार्‍यानेच रशियन महिलेवर हल्ला केला होता, त्यात ती जखमी झाली होती.

मांद्रे येथील रिसॉर्टबद्दल पोलिसांनी नोटीशीत म्हटले आहे की, रिसॉर्टमध्ये राहणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. हॉटेलमध्ये काम करत असलेल्या कामगारांची जे संशयित आरोपी आहेत त्यांचीही ओळखपत्रे नव्हती.

रिसॉर्टने सुरक्षाविषयक सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे तसेच रिसॉर्टला सबलेटदेखील केले आहे. त्यामुळे पोलिसांनी पर्यटन विभागाला या रिसॉर्टचा परवाना रद्द करण्याची विनंती केली आहे.

पोलीस तक्रारीच्या आधारे पर्यटन विभागाने रिसॉर्टला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि रिसॉर्टच्या मालकावर कारवाई का करू नये तसेच महिला पर्यटकाला जखमी केल्याबद्दल रिसॉर्ट सील का करू नये, अशी विचारणा केली आहे.

या कारणे दाखवा नोटीसला रिसॉर्ट मालकाने सात दिवसांत उत्तर द्यावे, असे सांगण्यात आले आहे. 31 मार्च मांद्रेतील रिसॉर्टमध्ये नेदरलँडच्या युवतीवर हल्ला झाला होता. तेव्हा तिला वाचवायला गेलेला युरिको डायस हा स्थानिक युवकही चाकू हल्ल्यात जखमी झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT