New Wetlands in Goa: गोव्यातील आणखी 24 पाणवठे 'वेट लँड' म्हणून घोषित होणार; जाणून घ्या ठिकाणे...

सरकारने मागवली नागरिकांची मते; 60 दिवसांची मुदत
New Wetlands in Goa
New Wetlands in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

New Wetlands in Goa: केंद्र सरकारच्या 2017 पाणथळ जमीन (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियमांतर्गत गोव्यातील आणखी 24 पाणवठे "वेटलँड" म्हणून घोषित केले जाणार आहेत.

या संदर्भात सार्वजनिक अभिप्राय मागवणारी अधिसूचना जाही करण्यात आली आहे.

New Wetlands in Goa
KTC New Buses For G20 Summit: गोव्यातील G20 बैठकीच्या पार्श्वभुमीवर 'कदंबा' खरेदी करणार मोठ्या आकाराच्या नवीन 100 बसेस

मसुदा अधिसूचनेत, गोवा राज्य वेटलँड प्राधिकरण (GSWA) ने पर्रा, करमाळी, धाकटे तलाव, इटा तलाव, मये, माखाजन, ओर्ली, बांदोळी, धुळपे, सपू, ओडली, ताळावली, बेताल, अडसुळे, कोदाळ, मनाली, कोळमवाडा, करंबोळी, कोनशे, बेती, पाले, सुलभाट, दुर्गा आणि तरवळे या तलावांना वेटलँड म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

या पाणथळ जागा पर्यावरणीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाच्या परिसंस्था मानल्या जातात. जैवविविधता आणि एकूणच पर्यावरणात वेटलँड्सची भूमिका महत्वाची असते. दरम्यान, अधिसूचनेत लोकांना याबाबत त्यांची मेत मांडण्यासाठी 60 दिवसांचा वेळ दिला आहे.

New Wetlands in Goa
Goa Well Geotag: राज्यातील विहिरी, बोअरवेलच्या जिओटॅगिंगला सुरवात; गोव्यात 5214 विहिरी...

करंबोळी येथे 5.63 लाख चौरस मीटरहून अधिक जास्त क्षेत्रफळात पाणथळ जागा आहे. त्यानंतर दुर्गा तलाव 2.31 लाख चौरस मीटर क्षेत्रात पसरला आहे. सपू तलाव किंवा टोलेम बंदर 2.07 लाख चौरस मीटर क्षेत्रफळ आहे.

बातीम सरोवराचे क्षेत्रफळ 1.67 लाख चौरस मीटर आहे तर मये सरोवराचे क्षेत्रफळ 1.02 लाख चौरस मीटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com