Amarnath Panajikar Dainik Gomantak
गोवा

Querim Beach: पीडितांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री वाढदिवस सोहळा रद्द करतील ? - पणजीकर

पर्यटन विभागाचा घोटाळा पुन्हा एकदा सिद्ध, असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकारने निरपराध कुटुंबांना उध्वस्त केले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Querim Beach: केरी समुद्रात चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या बातमीने भाजप सरकारचे "मिशन टोटल कमिशन" पुन्हा एकदा उघड झाले आहे. पर्यटन खाते समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करते पण दुर्दैवी घटना घडली तेव्हा जीवरक्षक आणि पर्यटक रक्षक कुठे होते? असा सवाल काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार का? पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री त्यांचा वाढदिवस सोहळा रद्द करतील का?

डॉ. प्रमोद सावंत यांच्या बेजबाबदार, असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकारने निरपराध कुटुंबांना उध्वस्त केले आहे, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

शोकाकुल कुटुंबियांना शोक व्यक्त करताना अमरनाथ पणजीकर यांनी असा आरोप केला की बुडण्याच्या घटनेने समुद्रकिनारा सुरक्षा करार हा पर्यटन विभागाचा घोटाळा असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

काँग्रेस पक्षाने वेळोवेळी बीच सेफ्टी आणि लिफगार्ड्स कंत्राट घोटाळा आणि बीच क्लीनिंग कंत्राट घोटाळा उघड केला आहे.

केरी बीचवरील घटनेने हे सिद्ध झाले आहे की कंत्राटदारांनी समुद्रकिनाऱ्यांवर पुरेसे जीवरक्षक तैनात केले नाहीत, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला. आमची मागणी आहे की या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

समुद्रकिनारा सुरक्षा कंत्राटदाराने गुंतलेले मनुष्यबळ आणि उपकरणे यांचे लेखापरीक्षण करावे. यावरून जनतेच्या पैशाची कशी लूट केली जाते हे सिद्ध होईल, असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT