Vijay sardesai: दिगंबर कामतांनी फातोर्डाच्या विकासात अडथळा आणू नये - सरदेसाई

पार्किंग प्रकल्प केवळ फातोर्डाच नाही तर संपूर्ण दक्षिण गोव्यासाठी फायदेशीर असल्याचे सरदेसाई यांनी सांगोतले
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Vijai Sardesai आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावचे सभापती आणि आमदार दिगंबर कामत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. दिगंबर कामत यांनी फातोर्डाच्या विकासकामात अडथळा आणू नये असा इशाराही त्यांनी दिलाय.

सरदेसाई यांच्या हस्ते आज डोंगरवाड्डो येथील 12 लाखांच्या नाल्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. माझ्या कार्यकाळात आम्ही सोनसोडोचे सर्व कामकाज घनकचरा व्यवस्थापनाला दिले होते.

Vijai Sardesai
Lairai Devi Jatra Utsav : शिरगावमधील ‘धोंडांची तळी’चा विकास; गैरसोय मिटली

मात्र दिग्ंबर कामत यांनी आजपर्यंत काय केले ते सांगावे. सोनसडोबद्दल ते फक्त भेट देत आहेत आणि स्वत:ला बातम्यांमध्ये ठेवत आहेत. मात्र कचऱ्यासंबंधी अद्याप कोणताही उपाय निघत नाही. केंद्राकडून रोज नवनवीन योजना आणल्या जात आहेत.

मात्र केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ मिळवून देण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. त्यामुळे दिगंबर कामत यांनी फातोर्डाच्या विकासकामात अडथळा आणू नये आणि थांबवू नये असा इशारा विजय सरदेसाई यांनी दिलाय.

Vijai Sardesai
Querim Beach: केरी समुद्रात एकाच कुटुंबातील चारजण बुडाले, घटनास्थळी शोध कार्य सुरू

यावेळी त्यांना पार्किंग प्रकल्पाबाबत विचारणा केली असता, सरदेसाई म्हणाले की, मी मंत्री असताना फातोर्डासाठी पार्किंग प्रकल्प प्रस्तावित केला होता आणि त्यावेळच्या कौन्सिलचे विद्यमान अध्यक्ष होते त्या परिषदेने ठराव केले होते.

पालिकेने जीएसयूडीएला जमीन देण्याची गरज नाही. GSUDA ने पाठवलेल्या आराखड्याला नगरपालिकेने आधीच मंजुरी दिली आहे त्यामुळे आता हँडओव्हरची गरज नाही.

हा पार्किंग प्रकल्प केवळ फातोर्डाच नाही तर संपूर्ण दक्षिण गोव्यासाठी फायदेशीर असल्याचे सरदेसाई यांनी सांगोतले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com