Sanjay Raut  Dainik Gomantak
गोवा

'उत्पल पर्रीकर यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही'

असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष घातले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा 'फॉर्म्युला' गोव्यात लागू करण्याचा त्यांच्या प्रयत्न फसला असला तरी राऊत गोव्यात तळ ठोकून आहेत. कॉंग्रेसने शिवसेनेचा हात धरला नसला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या महाराष्ट्रातील मित्रपक्षाबरोबर गोव्यात देखील ठाम उभे आहे. गोवा विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. (Goa Assembly Election 2022 Sanjay Raut Utpal Parrikar)

संजय राऊत (Sanjay Raut) महाविकास आघाडी बरोबर उत्पल पर्रीकर यांच्यावर देखील कायम भाष्य करत असतात. भाजपने उमेदवारी नाकारल्यावर राऊत यांनी 'मोठ्या मनाने' उत्पल पर्रीकर यांना शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले होते. मात्र, आपल्या या 'ऑफर'ला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात येताच त्यांनी सर्व विरोधी पक्षांनी उत्पल यांना पाठिंबा द्यावा, असे नवे धोरण राजकीय पटलावर मांडले. या त्यांच्या मागणीला अनेक पक्षांनी विरोध केला. कॉंग्रेसने (Congress) तर ही मागणी पूर्णपणे धुडकावून लावली. आज परत राऊत यांनी उत्पल पर्रीकर यांच्याबद्दल एक सूचक विधान केले आहे. पणजीमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवसेना उत्पल पर्रीकर यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही.

दरम्यान, राऊत यांनी परत एकदा भाजपला धारेवर धरले. महाराष्ट्रातील (Maharashtra) नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकांबद्दल बोलताना ते म्हणाले, भाजप महाराष्ट्रात क्रमांक एकचा विरोधी पक्ष आहे. मी त्यांचे या साठी अभिनंदन करतो. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना कुठपर्यंत मजल मरते हे बघण्यासाठी मतदार उत्सुक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT