'आप'चा गोव्यातील 'स्ट्रॅटेजिक मास्टरस्ट्रोक' भाजप आणि काँग्रेसला धक्का देणार?

आम आदमी पार्टीने भंडारी मुख्यमंत्री चेहरा जाहीर केला आहे.
Congress AAP BJP
Congress AAP BJPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात मोठ्या प्रमाणात भंडारी आणि कॅथलिक समाजाचे लोक राहतात. या दोन्ही समाजाच्या एकत्रित मतदारांची टक्केवारी ही 55% इतकी आहे. हे मतदार आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Election) निकालावर नक्कीच लक्षणीय परिणाम करू शकतात. (AAP Goa Election 2022)

Congress AAP BJP
मांद्रे मतदारसंघातून दीपक कलंगुटकर यांना गोवा फॉरवर्डची उमेदवारी

यातच आम आदमी पार्टीने भंडारी मुख्यमंत्री चेहरा जाहीर केला आहे. 'आप'ने अमित पालेकर यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून पुढे केले आहे. याचबरोबर त्यांनी कॅथलिक उपमुख्यमंत्रीपदाची घोषणा देखील केली आहे. परिणामी गोव्यातील (Goa) 30 हुन अधिक मतदारसंघात त्यांचा मताचा वाटा वाढण्याची शक्यता आहे.

Congress AAP BJP
गोव्यात कोरोनाचा कहर; राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 38.75%

या आपच्या 'स्ट्रॅटेजिक मास्टरस्ट्रोक'चा थेट धक्का भाजप (BJP) आणि काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. 1961 पासून, अडीच वर्षांचा कालावधी वगळता, त्यांच्या समुदायातून कधीही मुख्यमंत्री झालेला नाही. राजकीय क्षेत्रात कमी प्रतिनिधित्वाची त्यांची भावना लक्षात घेतल्यास संपूर्ण भंडारी समाजाचा पाठिंबा 'आप'ला मिळू शकतो.

गोव्यात (Goa) भंडारी समाज सर्वात मोठा आहे, मात्र त्यांच्यावर अन्याय झाला आहे. गोवा मुक्त झाल्यापासून केवळ एकदाच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद (CM) मिळाला. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक अन्याय झाल्याची भावना आहे. आम्ही जातीपातीचं राजकारण करतो असा आरोप होतोय, मात्र आम्हाला प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे भंडारी समाजाचा उमेदवारच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य असल्याचं केजरीवालांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com