Oceanarium in Goa | Tourism Minister Rohan Khaunte  Dainik Gomantak
गोवा

Marine Aquarium In Quitol Goa: किटलात साकारणार भव्य सागरी मत्स्यालय

800 कोटींचा खर्च : स्थानिकांसह पर्यटकांसाठी ठरणार आकर्षणाचे केंद्र

दैनिक गोमन्तक डिजिटल

Marine Aquarium In Quitol Goa: गोव्यातील ग्रामीण भागानाही पर्यटनाचे लाभ मिळावेत, या उद्देशाने केपे तालुक्यातील किटला येथे ओशनॅरियम (सागरी मत्स्यालय) सुरू करण्याची योजना आखली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी त्याबद्दल कोलवा येथे माहिती दिली.

स्थानिकांसह पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरेल. या प्रकल्पासाठी ८०० कोटीपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.

दशकभरापूर्वीच राज्य सरकारतर्फे मिरामार येथे ओशनॅरियम उभारण्याची योजना होती. परंतु ती प्रत्यक्षात आली नाही. तथापि, ओशनॅरियम आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे मत अधिकाऱ्यांनी मांडले होते.

‘डीपीआर’साठी प्रस्ताव मागवले

राज्य सरकार आणि पर्यटन विकास महामंडळच्या संचालक मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने बोलीदारांना तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यातून संकल्पनात्मक प्राथमिक डिझाईन आणि बाजारदरांवर आधारित तपशीलवार अंदाज मागवले आहेत.

"मी नुकताच पोर्तुगालमध्ये गेलो होतो. तिथे एक ओशनॅरियम पाहिले. गरज वाटल्यास पोर्तुगालबरोबर याबाबत तंत्रज्ञान भागीदारी करार करता येईल. चार वर्षांपूर्वी, राज्य सरकारने किटला येथील जागेची पाहणी केली होती. प्रकल्पासाठी ही जागा अत्यंत योग्य आहे."

-रोहन खंवटे, पर्यटन मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

Tracy De Sa: तरुणाईला थिरकवणारी हिप-हॉप स्टार, मूळ गोमंतकीय असणारी रॅपर 'ट्रेसी डी सा'

Goa Accidents: गोव्यात रस्त्यावर गाडी हाकणे वा चालणे दिव्य ठरत आहे; अपघातांचे प्रमाण आणि रस्ता सुरक्षा सप्ताह

Mapusa Police Quarters: म्हापसा पोलिसांचे ‘क्वाटर्स’ मोडकळीस! ‘साबांखा’चे दुर्लक्ष; कर्मचाऱ्यांची गैरसोय

मुंबईतही सुरु होणार गोव्यासारखी पायलट सेवा! रिक्षा-टॅक्सीला पर्याय, दर खिशाला परवडणारा; माहिती घ्या

SCROLL FOR NEXT