Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar : राज्यातील 40 तळ्यांचे सुशोभीकरण करणार

मंत्री सुभाष शिरोडकर यांची घोषणा ; अमृत सरोवर योजनेनुसार कार्यवाही

दैनिक गोमन्तक

सासष्टी : गोव्यातील 40 तळ्यांचे दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तीन ते चार तळ्यांच्या कामाच्या निविदा तयार आहेत. हे सुशोभीकरण व दुरुस्तीकरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘अमृत सरोवर’ योजने अंतर्गत होणार आहे. पंतप्रधानांनी केवळ घोषणा केली नसून राज्यांना केंद्र सरकारामार्फत अनुदानही देण्याचे जाहीर केले आहे. ही माहिती गोव्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मडगावात केले.

मंत्री शिरोडकर व फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई तसेच नगराध्यक्ष लिंडन परेरा व नगरसेवकांनी फातोर्डा दवंडे येथील बोास्ती तळे व श्री दामोदर लिंगा समोरील तळ्यांची पाहणी केली. पाहणी नंतर मंत्री शिरोडकर पत्रकारांकडे बोलत होते.

तळ्यांचे पुनरुज्जीवन करणे म्हणजे तळ्याच्या सभोवताली भिंत बांधणे व त्याच्या सभोवताली सुशोभीकरण करणे, अशी माहिती मंत्री शिरोडकर यानी दिली.अमृत सरोवर योजना देशभरातील तळ्यांसाठी राबविली जाईल.

शिवाय तळ्यांचे पुनरुज्जीवन करून त्याचा शेतीसाठीही उपयोग केला जाईल. पुढील 15 दिवसात खर्चाचा आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती देताना मंत्री शिरोडकर म्हणाले, जलसंपदा खात्याची कामे जास्त करून मार्च, एप्रिल व मे महिन्यांमध्ये पूर्ण केली जातात.

दवंडे तळ्याची दुरुस्ती

आमदार सरदेसाई म्हणाले, आपण हल्लीच झालेल्या विधानसभा अधिवेशनात दवंडे तळ्याच्या दुरुस्तीचा प्रश्र्न उपस्थित केला होता. मंत्र्यांनी पाहणी करून तो सोडविण्याचे आश्र्वासन दिले होते. त्याप्रमाणे आज मंत्री शिरोडकर येथे आले व पाहणी केली.

त्यामुळे तळ्याची दुरुस्ती व सुशोभीकरण होईल, अशी आपल्याला खात्री आहे. दुरुस्ती करताना त्याचा शेतीसाठीच्या वापराबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीनेही विचार केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT